शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

९२ कोटींच्या कामासाठी मोजावे लागणार २६३ कोटी

By admin | Published: July 14, 2017 12:36 AM

वीज वितरण कंपनीच्यावतीने शहरात एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून ‘अंडरग्राऊंड’ विद्युत केबल टाकण्याचे काम मंजूर आहे.

वीज कंपनी संभ्रमात : महापालिकेच्या आमसभेत ठेवणार प्रस्तावलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वीज वितरण कंपनीच्यावतीने शहरात एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून ‘अंडरग्राऊंड’ विद्युत केबल टाकण्याचे काम मंजूर आहे. महापालिकेच्या हद्दीत ३१५ किलोमीटर खोदकाम केले जाणार आहे. यासाठी ९२ कोटींचा खर्च अपेक्षित असला तरी रस्ता पूर्ववत करण्याचा मोबदला म्हणून वीज वितरण कंपनीला तब्बल २६३ कोटींची रक्कम महापालिकेला द्यावी लागेल. एवढी प्रचंड रक्कम रस्ता दुरूस्तीसाठी कोठून उभी करावी, हा प्रश्न विद्युत कंपनीसमोर उभा ठाकला आहे. त्यामुुळे महापालिकेने हे चार्जेस कमी करून नागपूर पॅटर्ननुसार वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे, अशा आशयाचा पत्रव्यवहार महापालिका आयुक्तांसोबत करण्यात आला आहे. शहरातील रस्ते खोदून करून २१० किलोमीटरची उच्चदाब वाहिनी , ११५ किलोमीटरची लघुदाब वाहिनी तसेच ९५ किलोमीटरचे कंडक्टर काढून कोटेड केबल टाकण्याचे आयपीडीएसच्या माध्यमातून वीज वितरण कंपनीद्वारे केले जाईल. खोदकाम आणि रस्ते पूर्ववत करण्यासंदर्भात मनपाचे विविध रस्त्यांचे दर निर्धारित आहेत. रस्ता दुरूस्तीकरणाचा सरसकट दर ९ हजार रूपये प्रती मीटरचा दर महापालिकेने निर्धारित केला आहे. त्यामुळे नागपूर पॅटर्ननुसार हे दर कमी करण्यासंदर्भात वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंत्यांनी यापूर्वी मनपा आयुक्तांशी दोनदा पत्रव्यवहार केला आहे. या ९२ कोटींच्या कामाचे ‘ई-टेंडरिंग’ देखील झाले आहे. या भूमिगत केबल लाईनचे आयुष्य २० ते २५ वर्षे असेल. यानंतर वीज पुरवठ्यासंदर्भातील अडचणी दूर होतील, असे वीज वितरण कंपनीचे म्हणणे आहे. केंद्रीय उर्जा मंत्रालयाच्या एकात्मिका ऊर्जा विकास योजनेंतर्गत दोन नवीन उपकेंद्र मंजूर असून यापैकी एक ३३ के.व्ही.चे उपकेंद्र शंकरनगरात तर दुसरे उपकेंद्र हे सातुर्णा परिसरात तयार करण्यात येईल. सातुर्ण्याचे उपकेंद्र तयार झाल्यानंतर साईनगर ते बडनेरापर्यंत वीज पुरवठ्याची समस्या मार्गी लागेल, अशी माहिती विद्युत कंपनीचे कार्यकारी अभियंता (शहर) सौरभ माळी यांनी दिली.दर दिवशी होणार ५०० मीटर खोदकाम भूमिगत विद्युत वाहिनीकरिता वीज कंपनीला दररोज ५०० मीटर खोदकाम करावे लागेल. आठवडाभरात रस्ता पूर्ववत करण्याचा मनपाचा नियम आहे. याअनुषंगाने स्थायी समिती, आमसभेत प्रस्ताव ठेऊन दरनिर्धारण केले जाईल. त्याच्या मंजुरीनंतरच या कामाला खऱ्या अर्थाने गती येईल. महापालिकेला विद्युत देयकांपोटी वीज वितरण कंपनीला जी रक्कम द्यावी लागते, ती रक्कम या रस्ता दुरूस्तीच्या कामातून कपात करण्याचा मुद्दाही चर्चेला येऊ शकतो. यादृष्टीने वीज वितरण कंपनी व महापालिकेत एक सामंजस्य ठराव करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून तो मनपाच्या आगामी आमसभेसमोर ठेवण्यात येणार येईल. त्यानंतरच या मुद्यावर निर्णय होणार असून कामाला गती येईल. २३६ नवीन ट्रान्सफार्मर्सआयपीडीएस ( एकात्मिक ऊर्जा विकास) योजनेंंतर्गत ९२ कोटींची कामे करण्यात येत आहेत. यामध्ये २१० किमीची उच्चदाब वाहिनी अंडरग्राऊंड करण्यात येणार आहे. तर ११५ किमीची लघुदाब वाहिनी अंडरग्राऊंड करण्यात येत आहे. कंडक्टर काढून कोटेड केबल भूमिगत पद्धतीने टाकण्यात येणार आहेत. मनपा क्षेत्रातील डांबरीकरण, मुरूम, रस्ते तसेच काँक्रीटचे रस्ते खोदून ते पूर्ववत करण्यासाठी वेगवेगळे निकष असून त्यानुसार प्रती मीटरनुसार दर आकारणी केली जाईल.