अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या उन्हाळी २०१९ परीक्षा केंद्रावर गैरहजर असलेल्या २७ सहकेंद्राधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास प्रत्येकी पाच हजारांचा दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद अशा स्वरूपाची कारवाईची प्रस्तावित आहे.विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांत १५५ महाविद्यालयांत परीक्षा केंद्रे आहेत. केंद्राधिकारी आणि सहअधिकारी अशा स्वरूपाची परीक्षांच्या काळात प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात येते. मात्र, उन्हाळी परीक्षेत तब्बल २७ सहकेंद्राधिकाऱ्यांनी केंद्रावर सतत गैहजेरी लावली आहे. प्राध्यापक वर्ग परीक्षांकडे दुर्लक्ष करीत असतील तर ही बाब चिंतनीय असल्याचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी नोंद घेतली. त्यामुळे परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी गैरहजर २७ सहकेंद्राधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाईचा पहिला टप्पा गाठला आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर गैरहजर राहिल्यास पाच हजारांचा दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद अशा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
२७ सहकेंद्राधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. उत्तर समाधानकारक नसल्यास कारवाई होणारच, यात दुमत नाही. परीक्षा या संवेदनशील बाबींविषयी हलगर्जीपणा सहन करणार नाही. - हेमंत देशमुख,संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ