शहरं
Join us  
Trending Stories
1
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
2
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
3
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
4
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
5
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
6
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
7
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
8
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
9
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
10
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
11
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
12
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
13
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
14
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
15
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
16
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
17
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
18
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
19
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 

27 तासांचा रेल्वे ‘मेगा ब्लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2022 11:33 PM

ब्लॉक कालावधीत उपनगरीय सेवा भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दरम्यान मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दरम्यान उपलब्ध राहणार नाहीत. मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरिजनेट होतील. तर रविवारी चालणाऱ्या वातानुकूलित उपनगरी सेवा बंद राहणार आहे.

ठळक मुद्देकर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटविणार, विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक करण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मध्य रेल्वे मुंबई विभागात १९ व २० नोव्हेंबर रोजी अप आणि डाऊन संथ मार्गावर, अप आणि डाऊन जलद मार्गांवर, तसेच अप आणि डाऊन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशीद स्टेशनच्या दरम्यान तब्बल दोन किमीपर्यंत क्रेन वापरून कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटविले जाणार आहे. त्याकरिता विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक अंमलात आणले  आहे. त्यामुळे नागपूर, भुसावळ मध्य रेल्वे मार्गावरून ये-जा करणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अमरावती-मुंबई एक्स्प्रेस ही गाडी १९ व २० नोव्हेंबर रोजी रद्द झाली आहे. ब्लॉक कालावधीत उपनगरीय सेवा भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दरम्यान मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दरम्यान उपलब्ध राहणार नाहीत. मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरिजनेट होतील. तर रविवारी चालणाऱ्या वातानुकूलित उपनगरी सेवा बंद राहणार आहे.

१९ नोव्हेंबर रोजी मेल, एक्स्प्रेस गाड्या रद्दनांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस (१७६१८), अमरावती - मुंबई एक्स्प्रेस (१२११२), सिकंदराबाद - मुंबई देवगिरी एक्स्प्रेस, निजामाबादमार्गे (१७०५८), नांदेड - मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस (१७६११), जबलपूर - मुंबई गरीबरथ (१२१८७)

२० नोव्हेंबर रोजी गाड्या रद्द मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस (१७६१७), मुंबई - जालना जनशताब्दी एक्स्प्रेस (१२०७१), मुंबई-जबलपूर गरीबरथ (१२१८८), मुंबई-मनमाड विशेष (०२१०१), मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस (१२१०९), मुंबई-नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस (१७६१२), मुंबई-अमरावती एक्स्प्रेस (१२१११), मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस (१२११०), पुणे - मुंबई प्रगती एक्स्प्रेस पनवेलमार्गे (१२१२६), मनमाड - मुंबई स्पेशल (०२१०२), जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस (१२०७२), मुंबई - सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस, निजामाबाद मार्गे (१७०५७), नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस (१७६१८). २१ नोव्हेंबर रोजी गाडी रद्दमुंबई- नांदेड तपोवन एक्सप्रेस (१७६१७) 

१८ नोव्हेंबर रोजी दादर येथून सुटणार गाड्यालखनौ जंक्शन- मुंबई पुष्पक एक्सप्रेस (१२५३३), हावडा- मुंबई एक्सप्रेस (१२८७०), अमृतसर- मुंबई एक्सप्रेस (११०५८), हावडा- मुंबई मेल नागपूरमार्गे (१२८१०), फिरोजपूर- मुंबई पंजाब मेल (१२१३८), हावडा- मुंबई मेल प्रयागराज छिवकीमार्गे (१२३२१) २० नोव्हेंबर रोजी नाशिक रोड येथून सुटणाऱ्या गाड्या मुंबई- नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस (१२१३९) 

२० नोव्हेंबर दादर येथून सुटणाऱ्या गाड्या - मुंबई- वाराणसी महानगरी एक्सप्रेस (२२१७७), मुंबई- हावडा गीतांजली एक्सप्रेस (१२८५९), मुंबई- लखनौ जंक्शन पुष्पक एक्सप्रेस (१२५३४), मुंबई- हावडा एक्सप्रेस (१२८६९), मुंबई- निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस (२२२२१), मुंबई- हावडा दुरांतो एक्सप्रेस (१२२६१), मुंबई- गोंदिया विदर्भ एक्सप्रेस (१२१०५), मुंबई- फिरोजपूर पंजाब मेल (१२१३७), मुंबई- नागपूर दुरांतो एक्सप्रेस (१२२८९), मुंबई- लातूर एक्सप्रेस (२२१०७), मुंबई- हावडा मेल नागपूर मार्गे (१२८०९), मुंबई- हावडा मेल प्रयागराज छिवकी मार्गे (१२३२२), मुंबई- अमृतसर एक्सप्रेस (११०५७) 

 प्रमुख जंक्शन, स्टेशनवर परतावा खिडक्या (रिफंड काउंटर) उघडल्या जाणार आहे. मार्गदर्शन करण्यासाठी मदत कक्षही सुरू करण्यात येणार आहे. चौकशीसाठी वेबसाइट, एनटीईएस ॲप असणार आहे.- जीवन चौधरी, जनसंपर्क अधिकारी, भुसावळ

नाशिकातून १९ नोव्हें. शॉर्ट टर्मिनेट गाडी - नागपूर- मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस (२२१४०) 

१९ नोव्हें.ला दादर येथे शॉर्ट टर्मिनेट रेल्वे- गोंदिया- मुंबई विदर्भ एक्सप्रेस (१२१०६), 

 

टॅग्स :railwayरेल्वे