वरूड : येथील चौघांची २८ लाखांनी फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या महिलेसह तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी धडपड चालविली आहे. मात्र, शुक्रवारीदेखील जामिनाबाबतचा न्यायालयीन निर्णय आलेला नाही. तपास अधिकारी व फिर्यादी शुक्रवारी दिवसभर अमरावती न्यायालयात होते. प्रकरणात आणखी काही बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शहरातील महेंद्र काठीवाले यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी आरोपी कल्पना मनोहर श्रीराव, दीपक शिवनारायण बटवाडा आणि प्रवीण धरमठोक (सर्व रा. वरूड) यांच्याविरुद्ध ६ जानेवारी रोजी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सन २०१५ ते २०१७ या काळात आरोपींनी काठीवाले आणि त्यांच्या नातेवाइकांचा विश्वास संपादन केला. कल्पना श्रीवास हिने दीपक बटवाडा आणि सुवर्णकार प्रवीण धरमठोक यांच्या माध्यमातून काठीवाले मायलेकींपासून घेतलेल्या २० लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्याची विल्हेवाट लावल्याचे चौकशीदरम्यान उघड झाले.
कोट
कुणाची या प्रकरणात फसवणूक झाली असेल, तर त्यांनी पोलिसांसोबत संपर्क साधावा. पोलिसांचे एक पथक आरोपींच्या शोधात रवाना केले आहे. यात आरोपींची संख्या वाढू शकते.
श्रेणिक लोढा, ठाणेदार
-------------