अमरावती : जिल्ह्यात सव्वा वर्षापासून कोरोनाचा कहर सुरू असून, दोन महिन्यांत कोरोनाने रौद्ररूप धारण केले आहे. मे महिन्यातही कोरोनाचा कहर सुरूच असून, गत काही दिवसांत ग्रामीण भागातील १४ तालुक्यात आतापर्यंत ७,२५६ बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये बाधित आणि मृत्यू वाढत असले तरी वरूड, मोर्शी, अचलपूर, चांदूर बाजार अंजनगाव सुर्जी या तालुक्याचे बाधितांचे आकडे पाहून आरोग्य यंत्रणेची कसरत वाढली आहे. एका महिन्यात लॉकडाऊन असतानाही बाधित आणि मृत्युसंख्या अद्यापही नियंत्रणात येत नसल्याने जिल्ह्यावरील संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. चार महिन्यात तेथे मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. इतरही तालुक्यांमध्येही बाधित आढळत आहेत. प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करत असून लॉकडाऊनमध्येही बाधित आणि मृतांची संख्या नियंत्रणात पाहिजे तशी येताना दिसत नाही. शासन व प्रशासनाकडून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावी उपाययोजना केली जात आहे. यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. शासन व प्रशासनाने जारी केलेल्या त्रिसूत्रीचे पालन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. त्यानंतरच यावर नियंत्रण मिळविता येणार आहे.
बॉक्स
बेफिकिरी बेततेय जीवावर
शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून, अनेक बाधित गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. मात्र, कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तसेच आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. यात जराही बेफिकिरी केल्यास जीवारह बेताण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाच्या सूचनांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे.
बॉक्स
तालुकानिहाय हॉटस्पॉट संख्या
अमरावती ७, भातकुली १४, मोर्शी ३५, वरूड ४७, अंजनगाव सुर्जी २२, अचलपूर ४३, चांदूर रेल्वे २४, चांदूर बाजार २७, चिखलदरा१५, धारणी १३, दर्यापूर ५,धामणगाव रेल्वे १३, तिवसा ४ नांदगाव खंडेश्र्वर १७ एकूण २८७