शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

पीडब्ल्यूडीमधून आदिवासींची २९ राखीव पदे गायब; धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:16 IST

Amravati : अजब-गजब कारभार; अधिसंख्य केले १०९, रिक्त दाखविली ८० पदे

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागातून अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेली तब्बल २९ पदे गायब झाली असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून पुढे आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागात गट 'अ' ते 'ड' संवर्गात एकूण मंजूर पदे १४ हजार १८१ आहेत. यापैकी अनुसूचित जमातीसाठी १ हजार ६० पदे राखीव आहेत. अनुसूचित जमातींची भरलेली पदे ८५८ आहेत. २०२ पदांचा पूर्वीचा अनुशेष शिल्लक आहे. जातवैधता प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांची संख्या ७४८ आहे. ११० जणांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या १०९ आहे. 

असा आहे रिक्त पदांचा समावेशयात आस्थापना- ३, सेवा १, सेवा २, सेवा ३. प्रशासन ४, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, मुख्य अभियंता (विद्युत) मुंबई, मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) मुंबई, मुख्य वास्तुशास्त्र, संचालक उपवने व उद्याने या १५ विभागातील पदांचा समावेश आहे.

अनुसूचित जमाती पदभरती तपशीलसंवर्ग                      एकूण मंजूर पदे       राखीव पदे         भरलेली पदे           अधिसंख्य पदे गट-अ                            ८९०                      १०७                      ८२                              १     गट-ब                            ३०९३                     २२२                      १९६                           १९ गट-क                           ७१८२                     ५१३                      ३८२                           ५७ गट-ड                            ३०१६                     २१८                      १९८                            ३२                                    १४१८१                    १०६०                     ८५८                          १०९

"अधिसंख्य पदावर १०९ जणांना वर्ग केल्यानंतर ती पदे रिक्त दाखवायला पाहिजे होती. पण केवळ ८० पदे रिक्त दाखविण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले (सार्वजनिक उपक्रम वगळून), राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी न्याय देऊन अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची विशेष पदभरती मोहीम राबवण्यात यावी." - मारोती खामकर उपाध्यक्ष, ट्रायबल फोरम पुणे विभाग

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागAmravatiअमरावती