अमरावती : इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेत शुक्रवार २३ फेब्रुवारी रोजी मराठी विषयाच्या पेपरला विद्यार्थी कॉपी करताना ३ विद्यार्थ्याना पकडल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या सुत्रांनी दिली. त्यात अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यात करजगाव येथील परीक्षा केंद्रावर दोन तर बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यात एक अशा ३ कॉपी बहाद्दरांना भरारी पथकाने पकडले आहे. बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ३६ हजार ७० परीक्षार्थी आहेत. बारावीसाठी कला, विज्ञान, वाणिज्य, व्यावसायिक अभ्यासक्रम व इतर विषय आहेत.
२१ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरु झाली असून आतापर्यत ३ विषयांचे पेपर संपले आहेत. दरम्यान, यंदा कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी महसूल, जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची देखील मदत घेतली जात आहे. परीक्षेदरम्यान जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ,शिक्षण उपसंचालक यांच्यासह शिक्षणाधिकारी,प्राथमिक,माध्यमिक विभाग व प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र भरारी पथक, बैठे पथकाचे असे नियोजन केले आहे. ही भरारी पथके विविध केंद्रांना भेटी देत आहेत. अशातच बारावीच्या परीक्षेत शुक्रवार २३ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या मराठीच्या पेपरला भरारी पथकांने विविध केंद्रांना दिलेल्या भेटीदरम्यान तपासणीत पेपर साेडवितांना तिन विद्यार्थ्यी कॉपी करतांना आढळून आले. बॉक़्स
उपाययोजनेतंतर आढळले कॉपी बहाद्दरबारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीचे प्रकरणे घडू नये अशा अनुषंगाने विभागीय शिक्षण मंडळाने विविध उपाययोजना केल्या आहे.याशिवाय ९ भरारी पथके गठीत केलेली आहेत. विशेष म्हणजे यंदा पाणी वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही नो एन्ट्री आहे.सोबतच परीक्षार्थीना चप्पल-बूट बाहेरच काढावे लागत असतांना कॉपी करतांना विभागात परीक्षेच्या तिसऱ्या दिवशी तीन प्रकरणे उघड झाली.