शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

शहरातील ८२ तडीपार, तिघांविरुद्ध एमपीडीए

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 6:00 AM

निवडणुकीदरम्यान अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांचे आठ पथके तयार करण्यात आली आहेत. अवैध दारूची विक्री, शस्त्र बाळगणे, पैशांची देवाणघेवाण आदी प्रकारांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. यासाठी पोलिसांची आठ भरारी पथके फिरस्तीवर राहतील. या पथकात आठ अधिकारी व प्रत्येकी चार कर्मचारी राहतील.

ठळक मुद्देविधानसभेसाठी पोलीस सज्ज : ७०० आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी, या उद्देशाने शहर पोलिसांचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार झाला आहे. शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतून ८२ आरोपींना तडीपार करण्यात आले असून, ३ गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए (झोपडपट्टी दादा) कारवाई करण्यात आली. ७०० हून अधिक आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला.निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या आदेशान्वये ८२ आरोपींना तडीपार केले असून, २७ आरोपी तडीपारीच्या रांगेत आहेत. याशिवाय तीन गुन्हेगारांवर एमपीडीए करण्यास मान्यता देण्यात आली असून, आणखी तीन गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीएची कारवाई केली जाणार आहे. निवडणुकीच्या राजकीय आखाड्यात गुन्हेविषयक घटना घडण्याची शक्यता असते. त्यावर पोलीस करडी नजर ठेवून आहेत. शहर आयुक्तालयातील ८० टक्के पोलीस निवडणुकीच्या बंदोबस्ताची धुरा सांभाळणार आहेत. पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनात तब्बल १८०० पोलीस बंदोबस्तात राहतील. त्यांच्या मदतीला होमगार्ड, सीआरपीएफच्या तीन तुकड्या तसेच अतिरिक्त पोलिस दलाची मागणी डीजी कार्यालयास करण्यात आल्याची माहिती बाविस्कर यांनी दिली. सोमवारी झालेल्या बैठकीला पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, शशिकांत सातव, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर, नीलिमा आरज उपस्थित होत्या.सीपींनी घेतली बैठकनिवडणुकीदरम्यान अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांचे आठ पथके तयार करण्यात आली आहेत. अवैध दारूची विक्री, शस्त्र बाळगणे, पैशांची देवाणघेवाण आदी प्रकारांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. यासाठी पोलिसांची आठ भरारी पथके फिरस्तीवर राहतील. या पथकात आठ अधिकारी व प्रत्येकी चार कर्मचारी राहतील. मतदान प्रक्रियेचे छायाचित्रीकरण केले जाणार आहे.५८ मतदान केंद्रांवर १७७ संवेदनशील बूथआगामी विधासभा निवडणुकीसाठी शहरात २६ मतदान केंद्रांवर ७६० बूथ आहेत. यातील ५८ केंद्रांचे १७७ बूथ हे संवेदनशील असून, तेथे पोलीस विशेष लक्ष ठेवणार आहेत. मतदान केंद्रावर बंदूकधारी पोलीस तैनात केले जाईल.शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया सुरुपोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील ३९५ नागरिकांकडे बंदुकीचा परवाना आहे. त्यांना नूतनीकरण करणे आवश्यक असते. निवडणुकीपूर्वी त्याच्याजवळील अग्निशस्त्र जमा करण्याच्या सूचना पोलीस विभागाकडून संबंधित नागरिकांना देण्यात आल्या असून, त्याप्रमाणे कारवाई सुरू झालेली आहे.

टॅग्स :Policeपोलिस