शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
3
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
6
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
7
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
8
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
9
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
10
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
11
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
13
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
14
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
15
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
16
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
17
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
19
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
20
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम

पूर्णा धरणात २४ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 1:38 AM

यावर्षी कमी पावसामुळे तालुक्यातील पूर्णा धरण केवळ २४ टक्के भरला आहे. जुलै अखेरपर्यंत ५१ टक्के सरासरी जलसाठा या धरणात नेहमी असतो. मात्र, यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने धरणात २७ टक्के जलसाठा कमी झाला आहे.

ठळक मुद्देपाणलोट क्षेत्रात पावसाची पाठ

पावसावर तालुक्यांची मदार। आतापर्यंत बरसला केवळ २३५ मिलीमीटरलोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : यावर्षी कमी पावसामुळे तालुक्यातील पूर्णा धरण केवळ २४ टक्के भरला आहे. जुलै अखेरपर्यंत ५१ टक्के सरासरी जलसाठा या धरणात नेहमी असतो. मात्र, यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने धरणात २७ टक्के जलसाठा कमी झाला आहे. त्यामुळे भविष्यात सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उपस्थित होण्याचे चित्र आहे.तालुक्यातील चांदूर बाजारसह जिल्ह्यातील १०५ गावांची तहान भागवणाऱ्या पूर्णा धरणात यंदा कमी पावसामुळे मोठी तूट झाली आहे. दोन महिने लोटूनही पावसाने मुबलक प्रमाणात हजेरी न लावल्याने धरणात केवळ २४ टक्के जलसाठा उपलब्ध होऊ शकला. पूर्णा धरणातील जलसाठा पूर्णत: मध्य प्रदेशातील भैसदेही व सावलमेंढा या भागात झालेल्या पावसावर अवलंबून असतो. मात्र, मध्य प्रदेशात गेल्या पंधरवड्यात अल्प प्रमाणात पाऊस कोसळल्याने धरणाच्या पातळीत विशेष वाढ झाली नाही. धरणात आजरोजी ४४३.६५ मीटर पाण्याची पातळी आहे. मात्र, जुलैअखेर ही पाण्याची पातळी ४४७.५२ म्हणजे ५१.६३ टक्के पाहिजे. तथापि, यावर्षी जून महिन्यापासून भैसदेही येथे १४९ मिमी, तर सावलमेंढा येथे केवळ ७२ मिमी पाऊस झाला आहे.दरवर्षी मध्य प्रदेशातील भैसदेही व सावलमेंढा या भागात उशिरा पाऊस हजेरी लावत असल्याने धरणात आॅगस्ट महिन्यात पाण्याची पातळी वाढते. मात्र, यंदा ही शक्यता कठीण आहे. धरणावरील कर्मचारी दररोज सावलमेंढा व भैसदेही येथील शेतकऱ्यांकडून पावसाची आकडेवारी घेतात. मात्र, महाराष्ट्रातील बेलकुंड परिसरात दूरध्वनीची सुविधा उपलब्ध नसल्याने त्या भागातील पावसाची आकडेवारी मिळत नाही आणि त्यामुळे पाणीपातळीत अचानक वाढ होऊ लागते. पाच वर्षांपूर्वी धरणाचा साठा अचानक वाढल्याने ऐनवेळी पाणी सोडावे लागले. त्यामुळे नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला होता.सुरक्षा बेदखलमराठवाडा भागातील एक धरणातील पाण्यात विष काळविल्याची घटना घडली होती. त्यामुळे तेथील ३० गावांचा पाणीपुरवठा बंद करावा लागला होता. त्यामुळे पूर्ण धरणाची सुरक्षासुद्धा अतिमहत्त्वाची आहे. धरणाच्या सुरक्षिततेकरिता परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र ते बंद आहेत. ड्युटीवर कार्यरत कर्मचारी पूर्णत: माहिती नसणे हेदेखील धरणाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.

टॅग्स :Purna Riverपूर्णा नदी