शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

अपघाती मृत्यू झालेल्या पोलिसाच्या कुटुंबाला ३० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 10:34 PM

अपघाती मृत्यू पावलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला एका बँकेमार्फत ३० लाखांचा धनादेश देण्यात आला. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते शुक्रवारी तो धनादेश मृत पोलिसाच्या कुटुंबीयांना प्रदान करण्यात आला. पहिल्यांदाच अशाप्रकारची मदत मिळाल्याने पोलीस वर्तुळात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसीपींच्या हस्ते धनादेश : बॅकेकडून लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपघाती मृत्यू पावलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला एका बँकेमार्फत ३० लाखांचा धनादेश देण्यात आला. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते शुक्रवारी तो धनादेश मृत पोलिसाच्या कुटुंबीयांना प्रदान करण्यात आला. पहिल्यांदाच अशाप्रकारची मदत मिळाल्याने पोलीस वर्तुळात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.माजी सैनिक सुनील सुकाडी भलावी हे पोलीस विभागात रुजू झाल्यानंतर त्यांचे १ सप्टेंबर २०१७ रोजी अपघाती निधन झाले. पोलिसांसाठी असणाऱ्या बँकेच्या योजनेत सुनील भलावी यांचे नाव होते. बँक अधिकारी सृष्टी राजन नंदा, अजय पिठोरे, यतींद्र नालकर्णी, आल्हाद कलोती, समीर झंझाड, अतुल अकर्ते व परमानंद कुमार यांनी सुनील भलावी यांच्या कौटुंबिक सदस्यांना योजनेतील लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार सुनील भलावी यांच्या कुटुंबीयांना ३० लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला. याशिवाय मृताच्या मुलाच्या शिक्षणासाठीही चार वर्षांपर्यंत एक लाखांची मदत केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिली. यावेळी उपायुक्तद्वय व अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.अपघाती निधन झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला बँॅकेच्या योजनेतून लाभ मिळाला आहे. याशिवाय त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठीसुद्धा चार वर्षांपर्यत खर्च दिला जाणार आहे.- दत्तात्रय मंडलिक,पोलीस आयुक्त.