सुदेश मोरेलोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : शहराला पाणी पुरविणाऱ्या शहानूर धरणात पावसाळ्याच्या मध्यावर अवघा ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे दर्यापूर-अंजनगाव शहर व तालुक्यातील खेड्यांना दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याचे संकेत प्रशासनाकडून मिळाले आहेत.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाने ३ आॅगस्ट रोजी जारी केलेल्या पत्रकात शहानूर धरणातून केला जाणाºया पाणीपुरवठ्याचा अपव्यय टाळण्याचे व पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे. शहानूर धरणात केवळ ३० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे यापुढे पाणी जपून न वापरल्यास आधीच एक दिवसाआड केला जाणारा पाणीपुरवठा यापुढे दोन दिवसाआड केला जाईल, असा इशारा मजीप्राच्या दर्यापूर उपविभागीय कार्यालयाने दिला आहे.धरणात २ आॅगस्ट रोजी केवळ १४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे व पाणीपातळी ४३३ मीटर आहे. गतवर्षी २ आॅगस्ट रोजी पातळी दोन मीटरने, साठा तीन दशलक्ष घनमीटरने आणि टक्केवारी सातने जास्त होती. यावरून दर्यापूर-अंजनगाव आणि दोन्ही तालुक्यांतील ३३६ गावगाडे नियमित पाणीपुरवठ्याअभावी प्रभावित होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.गेल्या ३० वर्षांच्या आकडेवारीचा अभ्यास केला असता, सन २०१२ पासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी पडलेल्या पावसामुळे पाणीसाठा कमी झाला आहे. आॅगस्ट महिन्यात ४४२ मीटर पातळी आवश्यक होती. शहानूर धरण भरण्याची सुरूवात आॅगस्टच्या प्रथम सप्ताहापासूनच होते. त्यामुळे अजूनही पावसाच्या सुखद आगमनाची अपेक्षा आहे.- सुमित हिरे, सहायक अभियंता, शहानूर उपविभाग, अंजनगाव सुर्जी.
शहानुरात ३० टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 10:04 PM
शहराला पाणी पुरविणाऱ्या शहानूर धरणात पावसाळ्याच्या मध्यावर अवघा ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे दर्यापूर-अंजनगाव शहर व तालुक्यातील खेड्यांना दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याचे संकेत प्रशासनाकडून मिळाले आहेत.
ठळक मुद्देकाटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन : दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचा इशारा