शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
2
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
3
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
4
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
5
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
6
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह १५ सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
7
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
8
... अशाने महाराष्ट्र कंगाल होईल; लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंचा घणाघात
9
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
10
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर
11
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड मदरशांवर मोठा निर्णय देणार; CJI च्या यादीत 'ही' महत्त्वाची प्रकरणे
12
उद्धव ठाकरे की शरद पवार? महायुतीची द्वारे कोणाला खुली होणार? देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
13
बुमराहनं गमावला 'नंबर वन'चा मुकूट; टेस्टमध्ये त्याच्यापेक्षा बेस्ट ठरला 'हा' गोलंदाज
14
Diwali 2024: इकडे कन्फ्युजनमध्ये राहाल, तिकडे शेअर बाजार चालूच राहिल.., पैसा जाईल; ३१ ऑक्टोबरचं काय?
15
राज ठाकरेंनी आपल्या मुलासाठी माहिम मतदारसंघच का निवडला? काय आहे तयारी? स्वतःच सांगितलं
16
सोलापुरात सर्वच प्रमुख पक्षांना बंडखोरीचं ग्रहण; कोणत्या मतदारसंघात कोण लढणार?
17
माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंना भाजपाचा पाठिंबा?; देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका
18
Maharashtra Election 2024: 'कशाला कोर्टात गेली?'; अजित पवार सुळेंवर भडकले; शरद पवारांनाही केला सवाल
19
मारुती सुझुकी स्वत:साठीच नाही तर दुसऱ्या कंपनीलाही इलेक्ट्रिक कार बनवून देणार; केव्हा करणार लाँच
20
Salman Khan : सलमान खानला ६ वर्षांत १२ पेक्षा जास्त वेळा जीवे मारण्याच्या धमक्या; कोणी केलेला फोन?

आरटीओच्या ३० सेवा झाल्या फेसलेस, संकेतस्थळावर जा अन्‌ लाभ घ्या 

By गणेश वासनिक | Published: June 23, 2023 3:25 PM

नवीन पद्धतीनुसार अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना आधार क्रमांकाची नोंदणी या प्रणालीवर करणार आहे.

अमरावती : नागरिकांना आरटीओच्या कामाकरिता कार्यालयात चकरा मारू नये, याकरिता नागरिकांनी आधार क्रमांकाचा वापर करून फेसलेस पद्धतीने परिवहन विभागाकडून आरटीओ सेवा देण्यात येत असून याचा लाभ घेण्याचे आव्हान प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गित्ते यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या १६ सप्टेंबर २०२२ रोजी च्या अधिसूचनामध्ये ५८ सेवा आधार क्रमांकचा वापर करून फेसलेस पद्धतीने देणेबाबत अधिसूचित केले आहे.

परिवहन विभागाने आतापर्यंत ३० सेवा फेसलेस केल्या आहे. नवीन पद्धतीनुसार अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना आधार क्रमांकाची नोंदणी या प्रणालीवर करणार आहे. आधार क्रमांक वरील मोबाईल नंबरवर ओटीपी जाणार असून ओटीपीची नोंदणी केल्यानंतर वाहन मालकाचे नाव व कार्यालय अभिलेखा वरील नाव याची खातरजमा होणार आहे. अर्जदारामार्फत वाहनाचे कामासंबंधी इतर कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे. आधार क्रमांकाचा वापर करून अर्ज केल्यास अर्जदारास कार्यालयात इतर कागदपत्रे जमा करण्यासाठी येण्याची आवश्यकता नाही.या सेवा झाल्या फेसलेस -

१)नोंदणी पुस्तिकेमध्ये पत्ता बदल२) दुय्यम नोंदणी पुस्तिका देणे,३) भाडे खरेदी करा रद्द करणे४) दुय्यम फिटनेस५) ना हरकत प्रमाणपत्र६) वाहनाचे विवरण पत्र७) मालकी हस्तांतरण करणे८) परवाना हस्तांतरण९) परवाना हस्तांतरण(परवानाधारकांच्या मृत्यूनंतर ),१०) परवाना रद्द करणे११) दुय्यम परवाना देणे१२) तात्पुरता परवाना१३) विशेष परवाना१४) परवाना जमा करणे१५) परवाना कायमस्वरूपी जमा करणे१६) परवाना नूतनीकरण१७) शिकाऊ अनुज्ञप्ती देणे१८) अनुज्ञप्ती वरील पत्ता बदलविणे१९) अनुज्ञप्तीचे नूतनीकरण करणे२०) अनुज्ञप्तीत बदल करणे२१) अनुज्ञप्तीचे विवरणपत्र२२) अनुज्ञप्ती वरील एखादे लायसन रद्द करणे२३) कंडक्टर लायसनमध्ये पत्ता बदल करणे२४) दुय्यम शिकाऊ अनुज्ञप्ती देणे२५) दुय्यम अनुज्ञप्ती देणे२६) अनुज्ञप्तीवरील पत्ता बदल२७) उत्तेजनात्मक माल वाहून नेण्याचे अनुज्ञप्तीत नोंद करणे२८) अनुज्ञप्ती वरील बायोमेट्रिक मध्ये बदल करणे२९) कंडक्टर लायसन नूतनीकरण३०) दुय्यम कंडक्टर लायसन------------------------------------या वेबसाईटवर जा अन्‌ लाभ घ्याSarathi.parivahan.gov.inVahan.parivahan.gov.in 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAmravatiअमरावती