युवक गणेश मंडळातील महिला कार्यकर्तींनी घेतले परिश्रम
चांदूर रेल्वे : शहरातील युवक गणेश मंडळाने यंदा महाप्रसादाला ३०० किलो पुरणाच्या पोळ्यांचे वितरण केले. याकरिता मंडळातील महिला कार्यकर्तींनी परिश्रम घेतले.
शहरात युवक गणेश मंडळ ६४ वर्षांपासून गणपती बाप्पांची स्थापना करीत आहे. खडकपुरा येथील चौकात भव्यदिव्य डेकोरेशन, लक्षवेधी रोषणाई करून १० दिवस व महिला व मुलींसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करीत गणपती बाप्पांची आराधना करतात. गतवर्षात कोरोना महामारीमुळे मंडळाने साध्या स्वरूपात बाप्पांची स्थापना केली. आरतीला येणाऱ्या महिला भाविकांकरिता लकी ड्राॅ काढून साडी भेट दिली. खडकपुरा येथील महिलांनी १६ तास मेहनत करून महाप्रसादाच्या दिवशी गणपती बाप्पांचे प्रिय पुरणपोळीचा नैवेद्य तयार केला. तब्बल ३०० किलो पुरण शिजविण्यात आले. भाविकांनी या महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
220921\1046-img-20210922-wa0013.jpg
photo