वरूड : तालुक्यात २२ फेब्रुवारी रोजी तब्बल ३१ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यात वरूड शहरातील १४, तर लगतच्या जरूड येथील १७ रुग्णांचा समावेश आहे. एवढ्या संख्येत कोरोना संक्रमित निघाले असताना, कुठेही कंटेनमेंट झोन उभारण्यात आलेले नाहीत. कोरोना संक्रमितांच्या संपर्कातील व्यक्तींशी कोणत्याही यंत्रणेकडून संपर्क केला जात नाही.
मोर्शी उपविभागीय अधिकाऱ्यांनी कोरोनासंदर्भातील उपाययोजनेकरिता एकही बैठक घेतली नसल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली. गृह विलगीकरणावर भर दिला जात असून, संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या बंद असून, प्रशासनात ताळमेळ नसल्याचे चित्र आहे. नागरिकांचा मुक्त संचार सुरू असून, कुणालाही कोरोनाचे भय नाही.
कोट
नागपूर, अमरावती येथे खासगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्यांची माहिती प्राप्त होत नाही. कुणीही विनामास्क बाहेर पडू नये. ताप असल्यास नजीकच्या रुग्णालयात तपासणी करावी.
- अमोल देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी, वरूड
-------