कामांना गती: ६ मध्यम व १८ लघु प्रकल्पांचा समावेशअमरावती : जिल्ह्यातील हजारो हेक्टर सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी व परिसरातील सिंचन क्षमता वाढविण्याकरिता जिल्ह्यात १ मोठा, ६ मध्यम, व १८ लघु प्रकल्प होत आहेत. यासर्व प्रलंबित प्रकल्पांसाठी २०१७-१८ या वर्षासाठी ३१२ कोटी १० लक्ष १० हजारांचे अनुदान मंजूर झाले आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या कामांना गती मिळणार आहे.अनेक प्रकल्पासाठी लागणारे जमिनींचे भुसंपादन , जेथे जमीन अधिग्रहित केली आहे. त्या गावातील नागरिकांचे पुनर्वसन आदी प्रक्रियेला वेळ लागत असल्याने अनेक प्रकल्प रखडले आहेत. याकरिता कोट्यवधी रुपयांच्या वाढीव निधींची आवश्कता आहे. जलसंपदा विभागाच्यावतीने वाढीव निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. गेल्या वर्र्षींच्या मंजूर निधीतून १८१ कोटी २९ लक्ष ९१ हजार एवढा निधी शिल्लक राहिला होता. त्यामुळे एकूण निधी हा ४९३ कोटी ४० लक्ष ०१ हजार एवढा निधी या वर्षात खर्च होणार आहे. यामध्ये मोठ्या प्रकल्पांमध्ये उर्ध्व वर्धा, तर मध्यम प्रकल्पांमध्ये पूर्णा, चंद्रभागा, सपन, पंढरी, वासनी, गर्गा, या प्रकल्पांचा समावेश आहे. लघु प्रकल्पांमध्ये चारघड, भगाडी, वाघाडी, बोरनदी, राजुरा, टाकळी कलान, सामदा, चंद्रभागा बॅरेज, निम्न साखळी, लोणी धवगिरी, चांदस वाठोडा, पाकनाला, रायगड, करजगांव, कवरानाला, हिराबंबई, बागलिंगा आदी प्रकल्पांचा समावेश आहे. यावर्र्षींच्य वर्षीक अर्थसंकल्पात सदर निधींची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात प्रकल्पांच्या कामांना गती मिळणार आहे. भुसंपादनासाठी जास्त पैसे लागत असल्यामुळे प्रकल्पांच्या इतर कामांची गती मंदावली आहे. ( प्रतिनिधी)
२५ प्रकल्पांसाठी ३१२ कोटींचे अनुदान
By admin | Published: April 30, 2017 12:05 AM