अमरावती : राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीट व अवेळी पावसाने झालेल्या नुकसानापोटी शासनाने ३१३ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. नाशिक, अमरावती, औरंगाबाद व नागपूर या चार विभागांतील बाधित शेतक-यांना ही मदत वितरित करण्यास ३ मार्च रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्यात शेतक-यांना ९६.७२ लाख रुपये मिळतील. औरंगाबाद विभागातील जालना जिल्ह्याला २४८२.५० लाख, परभणी ५८३२.५१ लाख, हिंगोली ४६७.४१ लाख, नांदेड १८६८.१४ लाख, बीड ४०७. १८ लाख, लातूर १६४३. ९३ लाख, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतक-यांना ३७०.०९ लाख रुपये मदत मिळणार आहे. औरंगाबाद विभागातील सात जिल्ह्यांना एकूण १३० कोटी रुपये मदत मिळणार आहे.अमरावती विभागात अमरावती जिल्ह्याला ६३५३.०१ लाख, अकोला २२२.१७ लाख, यवतमाळ १४०३.३१ लाख, बुलडाणा ४४६६.२६ लाख व वाशिम जिल्ह्यातील बाधित शेतक-यांना १५१८.७७ लाख असे एकूण १३९. ६३ कोटी रुपये मिळतील. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांकरिता ४२.२६ कोटी रुपये आले आहेत. यामध्ये नागपूरला २५४१ लाख, वर्धा ५०८.२९ लाख, भंडारा १२८.८८ लाख, गोंदिया ७०१.१५ लाख, चंद्रपूर -३३९.१४ लाख व गडचिरोली जिल्ह्याला ७.३९ लाख रुपयांची मदत मिळेल.राज्यात फेब्रुवारी २०१८ मध्ये झालेल्या गारपीट व अवेळी पावसाने १९ जिल्ह्यांमध्ये अडीच लाख हेक्टरवरील पारंपरिक पिके व फळ पिकांचे नुकसान झाले. त्या आपद्ग्रस्त शेतक-यांना एसडीआरएफच्या निकषानुसार ही मदत देण्यात येणार आहे. प्रचलित नियमांनुसार पारंपरिक पिके व बहुवार्षिक फळपिकांच्या ३३ टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतक-यांना दोन हेक्टर मर्यादेत मदत दिली जाईल. ही मदत संबंधित खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहे.अडीच लाख हेक्टर क्षेत्रात नुकसानराज्यात फेब्रुवारीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसाने १ लाख ४८ हजार ५०३ हेक्टर जिरायत, तर १ लाख ६ हजार ७४० हेक्टर क्षेत्रावरील बागायत पिके बाधित झाली. ३८ हजार ४६ हेक्टर क्षेत्रातील बहुवार्षिक पिकांनाही बाधा पोहोचली.
१९ जिल्ह्यांतील गारपीटग्रस्तांना ३१३ कोटींची मदत, शेती व फळपिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 6:46 PM