अमरावती : यंदाच्या १०० दिवसांतील भयंकर वास्तव समोर आले आहे. या कालावधीत तब्बल ३१५ बाधितांचा मृत्यू झाला व ३२,६१० कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. म्हणजेच एका दिवसात तीन व दर तासाला एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्याचे भयंकर वास्तव आहे. याशिवाय दिवसाला सरासरी ३२६ पॉझिटिव्हची नोंद झाली म्हणजेच तासाला १४ कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे.
यंदा १ जानेवारीला १९,७६८ कोरोनाग्रस्त व ३९६ बाधितांचा मृत्यूृ झाला होता. त्यानंतरच्या १०० दिवसांत म्हणजेच ११ एप्रिलला ७११ मृत्यू अन् ५२,३५८ पाॅझिटिव्हची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा ब्लास्ट झाल्यानंतर पुन्हा जानेवारीपासून रुग्णसंख्या वाढीस लागली व फेब्रुवारी व मार्च महिन्यात पुन्हा कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला, तो अद्यापही सुरू आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा ‘डबल व्हेरीयंट म्यूटंट’ आढळला व या नव्या स्ट्रेनमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने झपाट्याने संसर्ग वाढत आहे.
या दरम्यान पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आठ दिवसांचे लॉकडाऊन केल्यानंतर सुपर स्प्रेडर रोखल्या गेले व त्यानंतर केंद्र व राज्याचे तीन वेळा केंद्र व राज्याचे पथक जिल्ह्यात दाखल झाले. जिल्ह्यात वाढलेल्या कोरोना चाचण्यांमुळे अधिकाधिक पॉझिटिव्हची नोंद झाली व संसर्ग रोखला जात आहे. दरम्यान चाचण्यांमधील पाॅझिटिव्हिटी ही ४० टक्क्यांवर पोहोचली होती, ती आता १५ ते १८ टक्क्यांवर आलेली आहे.
जिल्हा व महापालिका प्रशासनाच्या पथकांद्वारे दंडात्मक कारवाया, स्वॅब केंद्रे वाढविण्यात आल्यानंतर आता संसर्गाचा आलेख माघारला आहे.
बॉक्स
नमुन्यांमध्ये आढळले ‘डबल व्हेरिएंट म्युटंट’
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अचानक वाढल्यानंतर येथील चार प्रकारातील १०० नमुने जिनोम स्टडीकरिता पुण्याला पाठविले असता, त्यात ‘बी १.६१७’ हा नवा स्ट्रेन आढळून आला. याशिवाय बाधितांच्या ७६ टक्के नमुन्यांत ‘डबल व्हेरिएंट म्युटंट’देखील आढळून आलेला आहे. हा स्ट्रेन फक्त अमरावतीत आढळून आल्याचे सांगण्यात आले व त्यामुळेच जिल्ह्यात अचानक संसर्ग वाढल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे.
बॉक्स
जिल्ह्यातील स्ट्रेन विदेशी नाही
जिल्ह्यात नोंद झालेला नवा स्ट्रेन हा विदेशी नसून येथेच आढळून आलेला आहे. शक्यतोवर दोन म्युटंट हे एका व्यक्तीत आढळून येत नाही. वेगवेगळ्या रुग्णांत आढळून येत असतात. मात्र, जिल्ह्यात दोन्ही म्युटंट एकाच रुग्णात आढळून आले आहे. तसेच हा स्ट्रेन विशेत: अमरावती जिल्ह्यातील नमुन्यांमध्येच आढळून आलेला आहे. ही बाब पुण्याच्या ‘एनआयव्ही’च्या तपासणीत पुढे आलेली आहे.
बॉक्स
जिल्हा पुन्हा होऊ शकतो विस्फोट
जिल्ह्यात नव्या स्ट्रेनमुळे कोरोना संसर्गाचा पुन्हा विस्फोट होऊ शकते, अशी शक्यता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी व्यक्त केली. यासाठी मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे व वारंवार हात धुणे, तसेच लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात चाचण्यांची क्षमता वत्वि करण्यात आलेली आहे. नागरिकांनीदेखील अंगावर दुखणे न काढता चाचणी करणे महत्त्वाचे आहे.
पाईंटर
दिनांक मृत्यू पॉझिटिव्ह
०१ जानेवारी ३९६ १९,७६८
१५ जानेवारी ४०८ २०,६२०
१ फेब्रुवारी ४१८ २१,९७९
१५ फेब्रुवारी ४३९ २५,७४३
०१ मार्च ५२१ ३५,८१६
१५ मार्च ६०५ ४२,८७६
०१ एप्रिल ६७७ ४८,९२३
११ एप्रिल ७११ ५२,३७८