शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

२५५ गावांना अधिग्रहणातील ३१४ विहिरींचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 1:31 AM

सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जून महिन्यात ३५० गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे. सद्यस्थितीत ५५ गावांमधील एक लाख दोन हजार नागरिकांची ५४ टँकरवर मदार आहे. पाणीटंचार्ईवर तात्पुरता उपाय म्हणून ३१४ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले, त्यावर २५५ गावांची तहान भागविली जात आहे.

ठळक मुद्देटंचाईची दाहकता वाढली : एक लाख नागरिकांची भागवितात ५४ टँकर तहान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जून महिन्यात ३५० गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे. सद्यस्थितीत ५५ गावांमधील एक लाख दोन हजार नागरिकांची ५४ टँकरवर मदार आहे. पाणीटंचार्ईवर तात्पुरता उपाय म्हणून ३१४ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले, त्यावर २५५ गावांची तहान भागविली जात आहे. प्रशासनाने यंदा कृती आराखड्यात १९३८ उपाययोजना सुचविल्या होत्या. त्यापैकी ३३० पूर्ण झालेल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावानेच जलसंकट वाढले असल्याचा आरोप होत आहे.गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीत घट झाली. गावागावांतील जलस्त्रोत आटल्यामुळे पाणीपुरवठ्याच्या योजना बंद पडल्या आहेत. यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाद्वारा ३१४ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे, तर ५५ गावांमध्ये ५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्यस्थितीत अमरावती तालुक्यातील बोडना, परसोडा, डिगरगव्हाण, मोर्शी तालुक्यात शिरखेड, अंबाडा, सावरखेड, लेहगाव, वाघोली, आसोना, पोरगव्हाण, पिंपळखुटा (मोठा) शहापूर, दहसूर, गोराळा, आखतवाडा चांदूर रेल्वे तालुक्यात आमला विश्वेश्वर, जळका जगताप, सालोरा, कारला, सावंगी मग्रापूर, निमला, आमदोरी, धामणगाव रेल्वे तालुक्यात उसळगव्हाण, तिवसा तालुक्यात कुºहा, ठाणाठुणी, भारवाडी, गुरूदेवनगर, मोझरी, वरखेड, तारखेड, सार्सी, चिखलदरा तालुक्यात भंग, आडनदी, भिलखेड, कोयलारी, पाचडोंगरी, धरमडोह, बहाद्दरपूर, सोनापूर, पिपादरी, कोरडा हनुमान, ढाना, कोरडा गवळी, भादरी, तारूबांदा, लवादा, भांद्री, कुलगंना, घौलखेडा बाजार, धारणी तालुक्यात ढोमणाढाणा, बुलूमगव्हाण, मलकापूर, खिरपाणी, खडीमल, सोमवारखेडा, अचलपूर तालुक्यात पथ्रोट, चांदूर बाजार तालुक्यात घाटलाडकी येथे सद्यस्थितीत टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा होत आहे. मागील आठवड्यात ४९ टँकर सुरू होते. मात्र, टंचार्ईची तीव्रता वाढल्याने एका आठवड्यात ५ टँकर वाढले आहेत. गतवर्षी अधिकतम १४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाच्या व्ही.आर. उगले, हरीश खरबडकर यांनी दिली.उर्ध्व वर्धा प्रकल्पात १४ टक्केच साठायंदा जिल्ह्यातील ८५ प्रकल्पांत सद्यस्थितीत १४० दलघमी (१४ टक्केच) साठा आहे. गतवर्षी याच दिनांकाला २७५ दलघमी म्हणजेच २८ टक्के साठा शिल्लक होता. सन २०१४ मध्ये २१०, सन २०१५ मध्ये १७०, सन २०१६ मध्ये १२०, तर सन २०१७ मध्ये २१४ दलघमी साठा शिल्लक होता. यंदा सरासरीपेक्षा कमी झाल्याने ही स्थिती ओढावली आहे. विशेष म्हणजे मध्यप्रदेशातदेखील कमी पाऊस झाल्याने एकमेव मुख्य प्रकल्प असलेल्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात सध्या १४ टक्केच साठा शिल्लक आहे.तालुकानिहाय खासगी विहिरींचे अधिग्रहणपाणीटंचार्ईवर तात्पुरता ईलाज म्हणजे खासगी विहिरींचे अधिग्रहण, जिल्ह्यात सद्यस्थितीत २५५ गावांमध्ये ३१४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. यामध्ये सर्वाधिक ५७ विहिरी चांदूर रेल्वे तालुक्यात आहेत. अमरावती ४५, नांदगाव खंडेश्वर ३२, भातकुली १, तिवसा २०, मोर्शी ४६, वरूड ३४, धामणगाव रेल्वे १२, अचलपूर ३०, चांदूरबाजार ८, चिखलदरा १०, धारणी १२ व अंजनगाव सुर्जी तालुक्यात ७ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई