लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : गेल्या पाच वर्षांपासून कोट्यवधी रोपे लावून महाराष्ट्र हिरवागार करण्याचे स्वप्न मनाशी बाळगलेल्या नागरिकांना जिवंत झाडांची कत्तल डोळ्यांदेखत पाहावी लागत आहे. तालुक्यातील कुऱ्हा बस स्थानकापुढे हा प्रकार घडला. येथे उभे असलेले तीन डेरेदार निंबवृक्ष रस्ता रुंदीकरणात अडसर ठरत असल्याचे सांगून तोडण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थ सावलीला पारखे झाले आहेत.तिवसा तालुक्यातील कुऱ्हा हे तिवसा, चांदूर रेल्वे, अमरावती, धामणगाव रेल्वे यांना जोडणारे मध्यवर्ती गाव आहे. सध्या कुऱ्हा बस स्थानकासमोरील दुपदरी मुख्य रस्ता तयार होत असून, त्याचे काम वेगाने सुरू आहे. येथे २७ ऑगस्ट रोजी रस्त्याच्या अगदी कडेला असलेले सुमारे ५० वर्षांचे तीन निंबवृक्ष नागरिकांदेखत तोडण्यात आले. परिसरातील काही जणांनी त्याल विरोध केला. मात्र, त्यांना कुणी जुमानले नाही. रस्त्यावरील हक्काची सावली आता झाडे तोडल्याने दुरावली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात सावली कुठे शोधायची, असा नागरिकांचा प्रश्न आहे.वृक्ष तोडण्याची रीतसर परवानगी देण्यात आली आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामाला अडथळा ठरत असल्यास झाड तोडण्याची परवानगी द्यावी लागते. तोडलेल्या झाडाच्या दुप्पट त्यांना झाडे लावावी लागणार आहेत. नियमाला धरून परवानगी देण्यात आली आहे.- आशिष कोकाटे, आरएफओ, चांदूर रेल्वेरस्त्यावरील वृक्षतोडीमुळे आमची हक्काची सावली गेली आहे. ५० वर्षांपासून सावली देत असलेली डेरेदार झाडे तोडली जाऊ नयेत. ती कायम ठेवून विकास व्हावा, ही अपेक्षा आहे.- विवेक बिंड, ग्रामस्थ कुºहा
३३ कोटींकडे डोळे; जिवंत झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 1:07 AM
तिवसा तालुक्यातील कुऱ्हा हे तिवसा, चांदूर रेल्वे, अमरावती, धामणगाव रेल्वे यांना जोडणारे मध्यवर्ती गाव आहे. सध्या कुऱ्हा बस स्थानकासमोरील दुपदरी मुख्य रस्ता तयार होत असून, त्याचे काम वेगाने सुरू आहे. येथे २७ ऑगस्ट रोजी रस्त्याच्या अगदी कडेला असलेले सुमारे ५० वर्षांचे तीन निंबवृक्ष नागरिकांदेखत तोडण्यात आले.
ठळक मुद्देतीन डेरेदार वृक्ष तोडले : कुऱ्हा बस स्थानकापुढील रस्ता बांधकामात अडसर