लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील रस्ते, पूल, इमारती बांधकाम आदी पायाभूत सुविधांसाठी राज्य शासनाकडून ३३ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक रस्ते व पुलांची कामे मार्गी लागून विकास गतिमान होणार असल्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी सांगितले.जिल्ह्यातील रस्त्यांच्या आवश्यक सुधारणा, पूल आदी अपेक्षित कामांबाबत पालकमंत्र्यांनी स्वत: ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली होती व ही कामे पूर्णत्वास जाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानुसार शासनाकडून अर्थसंकल्पात या रस्त्यांच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच याबाबतची पुढील प्रक्रिया सुरळीत होऊन ही कामे गती घेणार आहेत.खेड्यापाड्यांना जोडणाऱ्या अनेक महत्त्वाच्या रस्त्यांच्या सुधारणेची कामे याद्वारे होणार आहेत. रस्त्यांवरील आवश्यक पुलांचेही काम सुरू होणार आहे. यामुळे प्रभावी संपर्क यंत्रणा निर्माण होणार आहे. अनेक तालुक्यांच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दळणवळणासाठी सुविधा निर्माण होईल. राज्याच्या गतिमान विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.
असा मिळाला निधीराज्य महामार्ग ३०३ बेलोरा काटसूर आडगाव रस्ता १.२० कोटी, पूर्णानगर निरूळ गंगामाई वाकी खोलापूर रस्ता सुधारणा व पुलासाठी ३ कोटी, अडगाव यावली पिंपळविहीर मार्डी कार्ला ते चांदूर रेल्वे रस्ता सुधारणेसाठी १.५ कोटी, अडगाव यावली मार्गे माउली जहाँगीर रस्त्यासाठी ९० लाख, यावली-डवरगाव, मोझरी वऱ्हा रस्ता ४.५ कोटी, मार्डी-कारला- चांदूर रेल्वे मार्गासाठी ४ कोटी, तळवेल साऊर, तरारखेडा, आष्टी, वायगाव खारतळेगाव रस्त्यासाठी १.५ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.
या रस्त्यांचीही सुधारणाविर्शी, वायगाव रस्ता सुधारणा व छोट्या पुलासाठी २ कोटी, रिद्धपूर-बेलोरा- चिंचोली काळे–देवरी- कठोरा-नांदगावपेठ रस्ता सुधारणा व पुलासाठी ४ कोटी, तरारखेडा, पुसदा, रोहणखेडा, माउली जहाँगीर रस्ता सुधारणा व पुलासाठी ३, कोटी, उदखेड, खोपडा, शिरखेड रस्ता सुधारणेसाठी ३.७० कोटी, बहिरम, सरफापूर फाटा चांदूर बाजार, बेलोरा, यावली, चांदूर रेल्वे रस्ता सुधारणा व पुलासाठी १.७१ कोटी, नेरपिंगळाई, आखतवाडा वाठोडा, रस्ता सुधारणा व पुलासाठी १.९० कोटींची तरतूद आहे.