लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत पाचही जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश क्षमतेनुसार ३४५० जागा रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेषत: अभियांत्रिकीच्या माहिती व तंत्रज्ञान (आयटी) अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याचे वास्तव आहे.अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम या पाचही जिल्ह्यात विद्यापीठाकडून मान्यता प्राप्त २९ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. मात्र, गत तीन ते चार वर्षांपासून अभियांत्रिकी प्रवेशाचा फ्लो कमी झाला आहे. तर दुसरीकडे शैक्षणिक संस्था चालकांनी इमारती बांधून अभियांत्रिकी महाविद्यालये उभारली. आता या अभियांत्रिकी महाविद्यालयात काही अभ्यासक्रमांच्या प्रवेशास विद्यार्थी मिळत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. विभागासाठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश क्षमता ८०३० आहे. त्यापैकी ४५८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, ३४५० जागा अजुनही रिक्त आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाने शैक्षणिक सत्र-२०१८ चा अहवाल जाहीर केला आहे. दोन, चार वर्षांपूर्वी आयटी, कम्पुटर क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, या आशेने बहुतांश अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी माहिती व तंत्रज्ञान, कम्पुटर टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. मात्र, या क्षेत्रात रोजगाराच्या संधी नसल्याचे बघून या अभ्यासक्रमांत अलिकडे विद्यार्थी प्रवेश घेत नाही, असे अहवालातून स्पष्ट झाले आहे. मागणीपेक्षा अधिक महाविद्यालयांना मान्यता दिल्यामुळे ही परिस्थिती अभियांत्रिकी महाविद्यालयांवर ओढवल्याचे तज्ञ्जांचे मत आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांची प्रवेश क्षमता आणि मागणी यात बरीच तफावत असताना विद्यापीठाकडून बृहत आराखडा तयार करताना ही बाब का नमूद केली जात नाही, हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे.राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये अभियांत्रिकी प्रवेशाची हीच स्थिती आहे. काही कालावधीनंतर एखाद्या विषयात बदल होतो. हीच अवस्था आता अभियांत्रिकी प्रवेशाची आहे. मात्र, रोजगारभिमुख आणि कौशल्य विकासावर आधारीत अभ्यासक्रमांचा अंतर्भाव केला जाईल, त्यानंतर या अभ्यासक्रमांकडे पुन्हा विद्यार्थी वळणार, हे मात्र निश्चित.- मुरलीधर चांदेकरकुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.
अभियांत्रिकीच्या ३४५० जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 9:54 PM
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत पाचही जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश क्षमतेनुसार ३४५० जागा रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेषत: अभियांत्रिकीच्या माहिती व तंत्रज्ञान (आयटी) अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याचे वास्तव आहे.
ठळक मुद्देप्रवेशास विद्यार्थी मिळेना : माहिती व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ