अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३४ दीक्षांत समारंभ शुक्रवार, २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठ दीक्षांत सभामंडपात होणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक सेवा आयोग (एम.पी.एस.सी.) चे अध्यक्ष विठ्ठल मोरे दीक्षांत भाषण करतील. अध्यक्षस्थानी कुलगुरू मुरलीधर चांदेकर राहतील.दीक्षांत समारंभात गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना १०५ सुवर्णपदके, २२ रौप्यपदके व २४ रोख पारितोषिके असे एकूण १५१ पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. सर्वाधिक पदके प्राप्त करणाºया मुलांमध्ये सचिन जोशी यास ६ सुवर्ण व एक रौप्य, तर मुलींमध्ये महिदा महरोष मो. साकिब हिला पाच सुवर्ण व तीन रौप्य, प्रियल काजळकर हिला पाच सुवर्णपदकांचा समावेश आहे. विद्यापीठांतर्गत शिक्षक संशोधक विद्यार्थी संशोधनाचे कार्य करीत असून, आजपर्यंत ३१७८ संशोधकांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. विज्ञान पंडित (डी.एस्सी.) पदवीने दोन संशोधकांना यापूर्वी सन्मानित करण्यात येत आहे. याशिवाय मानव विज्ञान विद्याशाखेत तत्त्वज्ञान मानव विज्ञान पंडित (डी. लिट.) संतोष ऊर्फ भुजंगराव ठाकरे यांना ससन्मान प्रदान होणार आहे. आचार्य पदवीधारकांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा १६८, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा ५०, मानव विज्ञान विद्याशाखा १६६, आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा ५५ यांचा समावेश आहे.
अमरावती विद्यापीठाचा ३४ वा दीक्षांत समारंभ २३ फेब्रुवारीला होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 7:26 PM