फोटो - पी/१७/अनिल कडू फोल्डर
फोटो कॅप्शन - पहिली लस घेताना डॉ. रमेश कानुनगो
परतवाडा : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात ६५ लाभार्थ्यांना ही लस देण्यात आली. यात अचलपूरमध्ये ३५ कोरोना लसी शिल्लक राहिल्या.
ज्या डॉक्टरांवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना लस घेण्याकरिता यापूर्वीच नोंदणी केली होती, अशातील शंभर लोकांना ही लस देण्याचे नियोजन अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले होते. तशी त्या नावाची यादीही निश्चित करण्यात आली होती. यादीतील सर्वांना कॉल करून लसीकरणाची माहिती देत त्यांना बोलावण्यात आले. यात लस घेण्याकरिता येणाऱ्यांची संख्या कमी राहली. शंभरमधील १६ लोकांना वैद्यकीय कारणावरून रिजेक्ट केल्या गेले. यात ६५ लोकांना लसीचा डोज दिला गेला. या ६५ मध्ये आधीच नोंदणी केलेल्या पण पहिल्या यादीत नाव नसलेल्या काही आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेवर बोलावून ही लस दिली गेली. त्या पहिल्या यादीतील काही वारंवार कॉल करूनही ते लस घ्यायला आलेच नाहीत. सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत त्यांची वाट बघितल्या गेली.
या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ शनिवारला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते पार पडला. यात प्रथम लसीकरणाचा मान अचलपूरमधील डॉ. रमेश कानुनगो यांना मिळाला. यानंतर नोंदणी केलेल्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिल्या गेली.
लसीच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचेसह अचलपूरचे एसडीओ संदिपकुमार अपार, तहसीलदार मदन जाधव, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. एस. डी. ढोले यांचेसह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रसंगी व्यवस्था व नियोजनाची माहिती घेतली. उपस्थितांसमवेत संवादही साधला.
कोट
ही लस सुरक्षित आहे. कोरोनाला हरविण्याकरिता, त्यावर मात करण्याकरिता ती आवश्यक आहे. या लसीचे कुठलेही साईड इफेक्ट नाही. ही लस पहिल्यांदा मला घेता आली याचे मला समाधान आहे.
- डॉ. रमेश कानुनगो
अचलपूर.
कोट
अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पहिल्या दिवशी आरोग्य कर्मचाऱ्यांनी, डॉक्टरांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोज घेतला. शंभर डोजचे उद्दिष्ट होते. कोरोना लसीचे ३५ डोज शिल्लक आहेत. पहिल्या यादीतील शंभर लोकांपैकी काहींना वारंवार कॉल करुनही ते लस घ्यायला आले नाहीत. यादीतील १६ लोकांना वैद्यकीय कारणांवरून लसीचा डोज नाकारण्यात आला.
- एस. डी. ढोले
अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर.