अमरावती : महापालिका क्षेत्रात अद्याप ३४ कोटी ९८ लाख ५२ हजार ६७६ रुपयांची वसुली बाकी आहे. नागरिकांनी ३१ डिसेंबरपर्यंत भरणा न केल्यास त्यावर २ टक्के दंडाची आकारणी केली जाणार असल्याची प्रशासनाची माहिती आहे.
महापालिका क्षेत्रातील पाच झोनमध्ये ४७.८१ कोटींच्या मालमत्ता कराची मागणी आहे. यात १ एप्रिल ते २४ डिसेंबर दरम्यान १२.६३ कोटींची वसुली झालेली असून, ३४.९८ कोटींची वसुली अद्यापही बाकी आहे. झालेल्या वसुलीची २६.८३ टक्केवारी आहे. ३१ डिसेंबरपूर्वी मालमत्ता कराचा भरणा न केल्यास थकबाकी रकमेवर महापालिकेकडून २ टक्के दंडाची आकारणी केली जाणार आहे.
उत्तर झोनमध्ये ७.७३ कोटी, मध्य झोनमध्ये १०.४० कोटी, पूर्व झोनमध्ये ३.५७ कोटी, दक्षिण झोनमध्ये १०.४९ कोटी, व पश्चिम झोनमध्ये २.७७ कोटींची थकबाकी आहे. यंदा मार्च महिन्यापासून कोरोना काळात लॉकडाऊन असल्यामुळे सुरुवातीची वसुली ठप्प झाली होती. मात्र, जून महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतरही वसुलीची टक्केवारी वाढलेली नाही. त्यानंतर मिशन बिगेन अगेन अंतर्गत आता सर्व काही खुले झालेले असताना मालमत्ता कराची वसुली थंडावली आहे. मालमत्ता कर हा महापालिकेचा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत आहे. मात्र, अद्यापही ७४ टक्के वसुली माघारल्याचा थेट परिणाम विकासकामांवर होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
बॉक्स
प्रभागनिहाय वसुलीची स्थिती (२४ डिसेंबर)
प्रभाग मागणी वसुली बाकी
उत्तर झोन ११,५४,६७,४९६ ३,८१,२७,७९१ ७,७३,३९,७०५
मध्य झोन १४,३४,८२,०८७ ३,९४,२३,१०५ १०,४०,५८,९८२
पूर्व झोन ४,४५,९८,५२७ ८८,५६,७३९ ३,५७,४१,७८८
दक्षिण झोन १३,८५,१२,४८७ ३,३५,९८,४३७ १०,४९,१४,०५०
पश्चिम झोन ३,६१,०५,४८७ ८३,०७,३३६ २,७७,९८,१५१
एकूण ४७,८१,६६,०८४ १२,८३,१३,४०८ ३४,९८,५२,६७६
कोट
०००००००००००
०००००००००००००००
प्रशांत रोडे
आयुक्त, महापालिका