लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असताना शेतकऱ्यांना त्यांच्या तूर व चणा खरेदीची आस लागली आहे. तूर व चण्याचे माप व खरेदी रखडल्याने तब्बल ३५ हजार शेतकऱ्यांवर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे. खरीपपूर्व मशागत आणि मुलामुलींचे लग्न व अन्य आर्थिक व्यवहार कसा करायचा, अशी विवंचना त्यांच्यासमोर आहे. २४ हजार तूर उत्पादक व ११ हजार चणा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी रखडली आहे.खुल्या बाजारात शेतकऱ्यांची लूट होऊ नये, या उदात्त हेतूने शासानाने नाफेडकरवी तूर व चणा खरेदी केंद्र उशिरा का होईना, सुरू केले. तालुकास्तरावर १२ केंद्रांच्या माध्यमातून तूर-चण्याची आॅनलाइन नोंदणी करण्यात आली. त्यासाठी आॅनलाइन सातबारा, आधारकार्ड, पीकपेऱ्यांची नोंद अशा बाबी अनिवार्य करण्यात आल्या. तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवून शेतकऱ्यांनी आॅनलाइन सातबारा मिळवित व प्रसंगी हस्तलिखित सातबारा देत आॅनलाइन नोंदणी केली. मात्र, पुरेशा बारदान्याअभावी ३५ हजार शेतकऱ्यांच्या मालाचे मोजमाप व पर्यायाने खरेदी रखडली आहे. दोन ते तीन महिन्यानंतरही खरेदी व तूर, चण्याची किंमत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांवर उसनवारी व प्रसंगी सावकारी कर्ज घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे.९०२२ शेतकऱ्यांचीच तूर खरेदीजिल्ह्यातील अचलपूर, दर्यापूर, तिवसा, धारणी, चांदूररेल्वे, नांदगावर खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरूड, अमरावती व चांदूरबाजार या १२ ठिकाणी एकूण ३३ हजार २ शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी करण्यात आली. पैकी १३ एप्रिलपर्यंत ९०२२ शेतकऱ्यांची १ लाख २२ हजार ६२७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.चण्याचीही तीच स्थितीनाफेडद्वारे शासकीय हमीभावात चणा खरेदी करण्यासाठी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात १२ के ंद्र सुरु करण्यात आली. या केंद्रांवर १२ हजार ३२६ शेतकऱ्यांनी त्यांच्या चनाची आॅनलाईन नोंदणी केली. पैकी केवळ ३९६ शेतकऱ्यांची ६२०० क्विंटल चण्याची खरेदी करण्यात आली.
अमरावती जिल्ह्यातील ३५ हजार शेतकरी आर्थिक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:39 AM
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असताना शेतकऱ्यांना त्यांच्या तूर व चणा खरेदीची आस लागली आहे. तूर व चण्याचे माप व खरेदी रखडल्याने तब्बल ३५ हजार शेतकऱ्यांवर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे.
ठळक मुद्देखरेदी रखडली बारदाण्याअभावी मोजमाप होईना