१ जुलै रोजी मोहीम : वृक्ष लागवडीसाठी सज्जपरतवाडा : राज्यात येत्या १ जुलै रोजी एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. हा एक जागतिक विक्रम असल्याने शासनाने जय्यत तयारी केली आहे. वृक्ष लागवडीकरिता खोदलेले खड्डे, वृक्ष लागवड व वृक्षाची देखरेख या प्रत्येक टप्प्यावर जी.पी.एस. यंत्रणेचे नियंत्रण राहणार आहे. अचलपूर तालुक्यात १ जुलै रोजी वनपरिक्षेत्र परतवाडा ३५,५०० वृक्ष लागवड, सामाजिक वनिकरण अचलपूर ३,००० वृक्षलागवड व इतर शासनाचे २१ विभागात १४,३५५ वृक्ष लागवड असे एकूण ५२,८५५ वृक्षांची लागवड होणार आहे. यामध्ये स्वयंसेवी संस्था विविध मंडळ, खासगी व्यक्तीसुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. वृक्ष लागवडीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे एस.बी. बारखडे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक परतवाडा, वनविभाग अमरावती तसेच तालुका समन्वयक अचलपूर यांनी सांगितले. ११ जून रोजी लाकूड बाजार परतवाडा येथे बैठक पार पडली. बैठकीत शैलेंद्र अग्रवाल अध्यक्ष टिंबर असोसिएशन, पंकज अग्रवाल, धंजय नाकील, महेंद्र अग्रवाल, शरद पेंढारी, संतोष नरेडी, अरुण घोटकर, तसेच मेघजी सोनी, विलास घोटे, नईम व इतर सदसय होते. तसेच वनविभागाचे एस.बी. बारखडे, वनपरिक्षेत्र अधिकारी परतवाडा, आमले वनपाल, सुरेश काळे वनरक्षक धनंजय काळे उपस्थित होते.बैठक १ जुलै २०१६ रोजी पुढील प्रमाणे वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला. रोटरी क्लब अचलपूर १०१ वृक्ष लागवड, टिंबर असोसिएशन १०० वृक्ष लावगड, संकल्प सेवा अचलपूर १०० वृक्ष लागवड, नवरंग नवदुर्गा मंडळ १०१ वृक्ष लागवड, महावीर सॉ मिल ५० वृक्ष लावगड शहरामध्ये करण्याचा संकल्प केला या राष्ट्रीय मोहिमेमध्ये सहभागी झाले. तालुक्यामधील सर्व नागरिकांनी या वृक्ष लागवडीच्या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन एस.बी.बारखडे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक परतवाडा यांनी केले. (प्रतिनिधी)
अचलपूर तालुक्यात लागणार ३५ हजार झाडे
By admin | Published: June 14, 2016 12:08 AM