लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: स्थानिक राजापेठ पोलिसांनी जप्त केलेले ३.५० कोटी रुपये गुजरातमधील अहमदाबादेतील एका कृषी व्यावसायिकाचे असल्याचा दावा करण्यात आला. अहमदाबादहून अमरावतीला आलेल्या चार्टड अकाउंटंट व स्थानिक वकीलाने तसा दावा करणारे पत्र बुधवारी राजापेठ पोलिसांना दिले. अहमदाबाद येथील कमलेश शहा यांची ती रक्कम आहे, ती रिलिज करण्यात यावी, असे देखील त्या पत्रात नमूद आहे. दरम्यान, आयकर विभागाचे नागपूर येथील दक्षता पथक दुपारी ३ च्या सुमारास राजापेठ पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी झाडाझडती सुरू केली आहे.२७ जुलै रोजी पहाटे राजापेठ पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान फरशी स्टॅाप परिसरात दोन चारचाकी वाहनातून तब्बल ३ कोटी ५० लाख रुपये जप्त केले होते. प्रथमदर्शनी ती रक्कम हवाल्याचे असल्याचा निरिक्षण पोलिसांनी नोंदविले होते. रोकडसह दोन चारचाकी वाहने व सहा जणांना राजापेठ पोलिसांनी मंगळवारी सकाळपासून ताब्यात घेतले. त्यानंतर सीआरपीसीच्या कलम ४१/१ नुसार त्यांची चौकशी सुरू केली. मोाबईल लोकेशन व सीडीआरमधून ती रक्कम गुजरातहूूून अमरावतीमार्गे पुढे जाईल.
सीए, वकील पोलिसांच्या पुढ्यातसीए मयूर मधुकर शहा हे बुधवारी दुपारी अमरावतीत दाखल झाले. सोबत वकील मनोज मिश्रा यांना घेऊन ते राजापेठ ठाण्यात दाखल झाले. ती संपूर्ण रक्कम अहमदाबाद येथील कमलेश शहा यांची असून, ती रक्कम वैध आहे. त्याबाबतचा संपूर्ण व्यवहाराचा वैध दस्तावेज आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, ती रक्कम न्यायालयाच्या आदेशानेच देता येईल, अशी भूमिका ठाणेदार मनीष ठाकरे यांनी घेतली.
३.३४ कोटी चालले होते औरंगाबादलाजप्तीमधील एमएच २० डीव्ही ५७७४ या वाहनातून ३ कोटी ३४ लाख रुपये अमरावतीहून मुंबईला, तर एमएच १८ बीआर १४३४ या वाहनातून १६ लाख रुपये अमरावतीहूनच औरंगाबादला घेऊन जात असल्याची कबुली चार चालकांनी दिली. जप्त ३.५० कोटी रुपये एका फ्लॅटमधूनच वाहनात भरल्याचे चौकशीत समोर आले. येथील फ्लॅटमधून ज्या नीलेश पटेल व जिग्नेश गिरीगोसावी यांना ताब्यात घेतले, त्यांनीच तो पैसा पुढे पाठविण्याची जबाबदारी घेतली होती, मात्र, त्यांच्याकडे ती रक्कम नेमकी कुठून आली, हे अनुत्तरित आहे.