शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

मतमोजणीसाठी ३६ टेबल वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:10 PM

लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. याकरिता प्रत्येक मतदारसंघात १४ टेबलचे नियोजन जिल्हा निवडणूक विभागाने केले होते. मात्र, उमेदवार २४ असल्यामुळे निकालास विलंब होणार असल्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आता २० टेबलचे नियोजन करण्यात आले व याबाबत निवडणूक आयोगाला परवानगी मागितली आहे. मात्र, अद्याप ही परवानगी मिळालेली नाही.

ठळक मुद्देआयोगाला प्रस्ताव : सहा विधानसभा मतदारसंघांत राहणार १२० टेबल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. याकरिता प्रत्येक मतदारसंघात १४ टेबलचे नियोजन जिल्हा निवडणूक विभागाने केले होते. मात्र, उमेदवार २४ असल्यामुळे निकालास विलंब होणार असल्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आता २० टेबलचे नियोजन करण्यात आले व याबाबत निवडणूक आयोगाला परवानगी मागितली आहे. मात्र, अद्याप ही परवानगी मिळालेली नाही.जिल्हा निवडणूक विभागाच्या नियोजनानुसार नेमानी गोडाऊनमध्ये सहा गोदामांत सहा विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी १४ टेबल मतमोजणीसाठी ठेवण्यात येणार आहेत. मात्र यावेळी लोकसभेसाठी २४ उमेदवार व नोटा असे २५ उमेदवार असल्याने मतमोजणीला साहाजिकच विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाद्वारा प्रत्येक मतदारसंघात २० असे एकूण १२० टेबलांचे नियोजन केलेले आहे. म्हणजेच मतमोजणीसाठी ३६ टेबल वाढणार आहे व यामुळे किमान तीन तास तरी अगोदर निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यानुसार वाढीव टेबलांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आलेला आहे. मात्र, या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. लवकरच आयोगाची मान्यता मिळेल, अन्यथा पूर्वीच्याच नियोजनाप्रमाणे मतमोजणी होईल, असे निवडणूक विभागाने सांगितले.मतमोजणीचे टेबल वाढल्यास मनुष्बळदेखील वाढणार आहे. प्रत्येक टेबलवर एक सुपरवायझर व दोन सहायक राहणार आहे. त्यामुळे सहा मतमोजणी केंद्रावर मतमोजणीला ३६० कर्मचारी लागतील. याव्यतिरिक्त अन्य १०० असे एकूण ४६० ते ५०० मनुष्यबळाचे नियोजन तयार आहे. यासाठी आयोगाच्या मंजुरीची प्रतीक्षा केली जात आहे. दोन हजार केंद्रांवरुन इव्हीएम नेमाणी गोडाऊनमध्ये सील करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. २३ मे रोजी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.मतमोजणी प्रतिनिधीसाठी उमेदवारांची कसरतएका विधानसभा मतदारसंघात २० टेबल गृहीत धरल्यास प्रत्येक टेबलवर एक याप्रमाणे २४ उमेदवारांचे २४ प्रतिनिधी राहतील, म्हणजेच एका मतदारसंघात २० टेबलवर ४८० उमेदवारांचे प्रतिनिधी राहतील. असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असल्याने २,८८० प्रतिनिधी उपस्थित ठेवण्याची कसरत उमेदवारांना करावी लागणार आहे. मात्र, प्रमुख राजकीय पक्ष वगळता अन्य उमेदवारांसाठी ही परीक्षाच ठरणार आहे.उमेदवारांची संख्या जास्त असल्याने फेरीदेखील जास्त होणार आहे. त्यामुळे १४ ऐवजी २० टेबलांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. अद्याप मंजुरी मिळालेली नाही. प्रस्ताव मान्य झाल्यास दोन ते तीन तास अगोदर निकाल लागेल.- शरद पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी