शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

११ लाख पशुधनाला ३६ हजार मे.टन वैरणची तूट; रोज ३४६२ मे.टन चाऱ्याची गरज

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: May 10, 2024 11:35 PM

रखरखत्या उन्हाळ्याचे दोन महिने कठीणच

गजानन मोहोड, अमरावती: गतवर्षी सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाचे परिणाम आता जाणवायला लागले आहेत. सध्या दर महिन्याला १८ हजार मे.टन वैरणीचा तुटवडा पडत असल्याने पशुपालकांवर चांगलाच ताण आलेला आहे. प्रशासनाने उशिरा घेतलेल्या आढाव्याशिवाय फारसे प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. शिवाय चाऱ्याचे मागणी अर्ज प्राप्त नसल्याचे सांगत पशुसंवर्धन विभागाने हात झटकले आहेत.

जिल्ह्यात लहान-मोठे असे एकूण १०,१७,८१७ पशुधन जिल्ह्यात आहे. यावर्षी सोयानीन, हरभरा, तुरीच्या कुटाराची कमतरता आहे. या पशुधनाला दरदिवशी किमान ३४६२ मे.टन चाऱ्याची गरज आहे. सोबतच हिरवा चारा देखील आवश्यक आहे. मात्र, सर्वत्र रखरखते असल्याने रानावनात चारा नाही. शिवाय साठवणूक केलेली वैरण संपल्यात जमा आहे. काही शेतकऱ्यांनी थोडीफार चाऱ्याची साठवणूक पेरणी काळात बैलजोडीसाठी केलेली आहे. नवीन चारा तयार व्हायला किमान दोन ते अडीच महिन्यांचा अवधी आहे. या कालावधीत पशुधन कशी जगवावी, हा प्रश्न पशुपालकांसमोर उभा ठाकला आहे. 

असा लागतो रोजचा चारा!

जिल्ह्यात पशुधनाला रोज ३४६१.८४ मे.टन चारा लागतो. यामध्ये अमरावती २७८.५७ मे. टन, अंजनगाव सुर्जी १७८.८०, अचलपूर ३९५.३७, भातकुली १४४.१२, चांदूर बाजार २१४.५४, चांदूर रेल्वे १८५.७६, धामणगाव २२२.९८,धारणी ३७१.३७, दर्यापूर २११.५७, चिखलदरा ३६९.६७, मोर्शी २५१.३९, तिवसा १७७.१४, वरुड २५०.२८ व नांदगाव तालुक्यात २१०.२१ मे. टन चारा लागतो.

टॅग्स :Amravatiअमरावती