शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

अमरावती महापालिकेच्या डोक्यावर ३६० कोटींच्या थकबाकीचा डोंगर !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 11:38 AM

दरमहिन्याला होऊ लागली वाढ : कंत्राटदारांच्या आंदोलनाच्या पवित्र्याने प्रशासन घायाळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महानगरपालिकेचे एकूण दायित्व तब्बल ३६० कोटींच्या घरात पोहोचले आहे. ते मार्च २०२४ मध्ये ३२६.६२ कोटी होते. मात्र, गेल्या तीन महिन्यांतदेखील पुरेशी थकबाकी वा देयके दिली न गेल्याने जूनअखेर त्यात ३४ ते ३५ कोटींची भर पडली आहे. अर्थात मनपा प्रशासनाकडे तब्बल ३६० कोटी रुपये थकले आहेत.

सुमारे ३६० कोटी रुपयांपैकी तब्बल १०१ कोटी रुपये प्रशासनाला महापालिकेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी, निवृत्तांना त्यांच्या वेतनासह सहाव्या व सातव्या वेतन आयोगाची थकबाकी रक्कम द्यायची आहे. तर महावितरण, मजीप्राची ४४ कोटी रुपये द्यायचे आहेत. मनपाच्या स्वउत्पन्नाला आलेली मर्यादा, रखडलेला शासननिधी व आस्थापना खर्चात झालेली वाढ दायित्वात भर घालणारी ठरली आहे.

असे आहे दायित्वकार्यरत, निवृत्त अधिकारी कर्मचारी वेतन, थकबाकी ७४.११ कोटीसेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपदान, अर्जित रजा : १९. ६५ कोटी डीसीपीएस योजनेतील महापालिकेचा हिस्सा : ७.०६ कोटीएनर्जी इफिशिएन्सी सर्व्हिस लिमिटेड : २८.०८ कोटीविद्युत व पाणीपुरवठा देयक : ४४ कोटीस्वच्छता, बांधकाम कंत्राटदार, पुरवठादार : ४३ कोटीअकोली भूसंपादन : ४१.५८ कोटीपाणीपुरवठा निर्भय योजना : ४९.८८ कोटीपाणीपुरवठा टप्पा क्रमांक २: ८.५२ कोटी रुपये

जुन्या स्वच्छता कंत्राटदारांकडून आंदोलनमार्च २०२४ पर्यंत जुन्या स्वच्छता कंत्राटदारांचे सुमारे १६ कोटी रुपये मनपाकडे थकीत आहेत. जूनपर्यंत त्यातदेखील वाढ झाली आहे. जुने स्वच्छता कंत्राट जानेवारी २०२४ मध्ये संपुष्टात आले असताना त्यांनी निविदा भरतेवेळी जमा केलेली १०.५० कोटी रुपये सुरक्षा ठेव त्यांना परत करण्यात आलेली नाही. ती रक्कम कुठे खर्चिली गेली, त्याचा हिशेब प्रशासनाकडे नाही. थकीत देयके व एसडीसाठी जुने स्वच्छता कंत्राटदार वारंवार आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत.

बांधकाम कंत्राटदारांचे २५ कोटी थकलेबांधकाम कंत्राटदारांचे देखील सुमारे २५ कोटी २३ लाख २० हजार ६०० रुपये महापालिकेकडे थकीत आहेत, तर दोन कोटी रुपये पुरवठादारांचे थकले आहेत. ही मार्च २०२४ ची आकडेवारी असून त्यात तीन महिन्यांनंतर मोठी वाढ झाली आहे.

मजीप्रा, महावितरणचे ४४ कोटी रुपये थकीतमनपाकडे मजीप्राचे अर्थात पाणीपुरवठ्याचे १३ कोटी रुपयांची देयके थकली आहेत. तर दुसरीकडे महावितरणची तब्बल ३१ कोटी कोटी रुपयांची रुपयांची देयके महापालिका प्रशासन देऊ शकली नाही. महावितरणने एखाद्या भागाचा वीजपुरवठा खंडित केला की, एक- दोन कोटी रुपये देऊन वेळ मारून नेली जाते. महावितरणने यापूर्वीदेखील शहरातील विद्युत पुरवठा अनेकदा देयक न भरल्याने खंडित केला आहे. महावितरण वारंवार थकीत देयकासाठी नोटीस पाठवित असते.

"मार्च २०२४ पर्यंत महापालिकेवर एकूण ३२६ कोटी ६२ लाख रुपयांचे दायित्व होते. १५ व्या वित्त आयोगाचा निधी न आल्याने अनेक देयके थांबली. त्यामुळे जूनअखेर एकूण दायित्वात काही कोटींनी वाढ झाली आहे. त्यातील १०० कोटी रुपये कार्यरत व निवृत्त कर्मचाऱ्यांना देय आहेत."- डॉ. हेमंत ठाकरे, मुख्य लेखा अधिकारी 

टॅग्स :Amravatiअमरावती