शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
2
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
3
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
4
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
6
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
7
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
8
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
9
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र
10
“राहुल गांधीची भूमिका संविधान बचाओ, फडणवीसांना शहरी नक्षलवाद का वाटतो?”; काँग्रेसचा सवाल
11
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
12
'बविआ'समोर भाजपचे आव्हान! जागा शिंदेंच्या पण उमेदवार भाजपचे
13
"काहीही झालं तरी जातनिहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणारच"
14
"मी त्यांना नोटीस पाठवतो"; रामराजेंबाबत अजित पवारांना घेतली कठोर भूमिका, कारण...
15
'तो' एक फॉर्म्युला लागू झाल्यास परळीत धनंजय मुंडेंची होणार अडचण; नेमकं राजकारण काय?
16
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
17
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
18
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
19
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
20
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी

एकाच ठिकाणी आढळले ३७ साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 10:56 PM

भातकुली तालुक्यातील उत्तमसरा गावात एकाच ठिकाणी ३७ साप आढळून आल्याने खळबळ उडाली. वसा संस्थेच्या सर्पमित्रांनी सर्व सापांचा सुरक्षित रेस्क्यू करून वनविभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

ठळक मुद्देवसा संस्थेचे रेस्क्यू : पिलांसह मादीची नैसर्गिक अधिवासात रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भातकुली तालुक्यातील उत्तमसरा गावात एकाच ठिकाणी ३७ साप आढळून आल्याने खळबळ उडाली. वसा संस्थेच्या सर्पमित्रांनी सर्व सापांचा सुरक्षित रेस्क्यू करून वनविभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.उत्तमसऱ्यातील वसा रेस्क्यू सेंटरमधील शौचालयाच्या मागे इंधन ठेवले आहे. बुधवारी सकाळी वसाचे सर्पमित्र भूषण सायंके तेथे गेले असता, त्यांना शौचालयाजवळ सापाची दोन पिल्लं आढळून आली. तिथे ठेवलेल्या इंधनामधून फुत्कार ऐकू आला. रहदारीचा रस्ता आणि सेंटरमधील उपचार घेत असलेले प्राणी जवळपास फिरत असल्याने त्यांनी लगेच वसाचे पॅरा-वेट्स शुभम सायंके यांना बोलावून पिल्ले व मादी साप इंधनाबाहेर काढले. त्यावेळी त्या ठिकाणी मादी साप व ३६ पिल्ले आढळून आलीत. सर्पमित्रांनी साप घेऊन बडनेरा वनक्षेत्राचे कार्यालय गाठले. तिथे रीतसर नोंद करून वनाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली सापांना नजीकच्या परिसरात मुक्त करण्यात आले. यावेळी वसाचे गणेश अकर्ते, सागर शृंगारे, शैलेश आखरे, मुकेश वाघमारे, सागर फुटाणे, रोहित रेवाळकर, अनिकेत सरोदे तसेच विशाल भटकर, गवई हे वनअधिकारी आणि अभि दाणी, अक्षय चांबटकर, ठकसेन इंगोले हे वन्यजीवप्रेमी उपस्थित होते.घोणस देतो पिलांना जन्मसापांमध्ये प्रजनन प्रक्रियेनुसार विविपॅरस (अंडी घालणारी) आणि ओव्होव्हिव्हीपॅरस (पिलांना जन्म घालणारी) असे प्रकार आहेत. घोणस साप जानेवारी ते मे दरम्यान प्रजनन करताना आढळून आले आहेत आणि त्यांची नवजात पिल्ले जून ते आॅक्टोबर महिन्यात दिसून येतात.म्हाडा कॉलनीतील सर्पमित्र जय सोहने यांना परिसरातून दोन फुटाचा अजगर पकडून सर्पमित्र धीरज शिंदे (रा. किरणनगर) यांच्या ताब्यात दिला. त्यांनी वनविभागाकडे नोंद करून अजगराला जंगलात सोडले.घोणस सापाची मादी १४ ते ६९ पिले देऊ शकते. आम्ही मादी घोणस व तिच्या ३६ पिलांची सुटका केली. या मादी घोणसची लांबी ४ फूट ११ इंच, तर पिलं ६ ते ९ इंच लांबीची आहेत.- निखिल फुटाणे, सर्पमित्र, वसा संस्था, अमरावती