डीपीसी बैठक : सर्वंकष योजनांसाठी आवश्यकतेनुसार निधीची तरतूद अमरावती : जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन ठरविण्यासाठी गेल्या एक वर्षानंतर रविवारी विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री तथा उद्योग, खनिकर्म राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडली. बैठकीत जिल्हयाच्या सुमारे ३७५ कोटी रूपयांच्या आराखड्यास सर्व सहमतीने शिक्कामोर्तब करण्यात आले .बैठकीला आमदार वीरेंद्र्र जगताप, यशोमती ठाकूर, अनिल बोंडे, बच्चू कडू, रवी राणा, प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, महापौर रिना नंदा, जिल्हा परिषदेचे सदस्य, मनपाचे निमंत्रित सदस्य आणि जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी ३७५ कोटी रुपयांचा आराखडा मांडण्यात आला होता. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत १६३ कोटी रुपये, आदिवासी उपयोजनांसाठी १२१ कोटी रुपये आणि विशेष घटक योजनेच्या ९१ कोटींचा समावेश आहे. जिल्हा वार्षिक सवर्साधारण योजनेंतर्गत कृषी संलग्न सेवेसाठी १७ कोटी ६९ लक्ष, ग्रामविकासासाठी ४ कोटी ९० लक्ष, पाटबंधारे व पूरनियंत्रणसाठी ४ कोटी ५७ लक्ष, ऊर्जेसाठी ३ कोटी २५ लक्ष रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
३७५ कोटींचा आराखडा मंजूर
By admin | Published: January 18, 2015 10:26 PM