महापौरांचा निर्णय : मंगळवारी आमसभेत मिळणार मान्यताअमरावती :महानगरात पहिल्यांदाच ३८ कोटी रुपयांचा फिश हब साकारला जात असून त्याकरिता विकास आराखड्याला महापालिका आमसभेत मंगळवारी मान्यता प्रदान केली जाणार आहे. महापौर चरणजितकौर नंदा यांनी सोमवारी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून हा फिश हब साकारला जात आहे. येथील शुक्रवार बाजार, बडनेऱ्यातील सोमवार बाजार, मध्यवर्ती नाक्याच्या मागील बाजुस फिश हबच्या अनुषंगाने जागा निश्चित करण्यात आली आहे. महापालिका आमसभेत विकास आराखड्या मान्यता मिळाली की राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाणार आहे. कें द्र शासन ४० तर ६० टक्के राज्य शासन निधी उपलब्ध करुन देणार आहे. फिश हब साकारण्यासाठी विकास आराखडा मंजूर करण्यासाठी मंगळवारी होणाऱ्या आमसभेत प्रस्ताव असून तो सर्वसंमतीने मंजूर केला जाणार आहे. (प्रतिनिधी)फिश हबमुळे भविष्यात रोजगार उपलब्ध होणार आहे. हा मोठा प्रकल्प महानगरात येत असून मासोळी व्यवसायासाठी सुवर्ण बाब ठरणारी आहे.- चरणजित कौर नंदामहापौर, महापालिका.
३८ कोटींच्या फिश हबला हिरवी झेंडी
By admin | Published: January 19, 2016 12:13 AM