लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आरटीओच्या नियमावलीचे सर्रास उल्लंघन होत असल्याने आरटीओने कारवार्इंचा बडगा उगारला असून, ११० वाहनांची तपासणी करून ३८ स्कूल बस व व्हॅनचालकांवर कारवाई केली. यातून ४३ हजार ७९० रुपये दंड वसुली करण्यात आली. ही मोहीम १५ दिवस राबविण्यात येणार आहे.स्कूलबसेसमध्ये महिला अटेंडन्टनच नसल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. याची दखल आरटीओने घेत शाळा व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्राद्वारे महिला अटेंडन्ट नेमण्याच्या सूचना वजा विनंती करण्यात येणार आहे. विद्यार्र्थिंनीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक स्कूलबसमध्ये महिला अटेंडन्टची नेमणूक करणे अनिवार्य आहे, असे आरटीओंनी स्पष्ट केले.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्कूल बसेसवर कारवाई सुरूच आहे. महिला अटेंडन्टची नेमणूक करण्यासंदर्भात शिक्षणाधिकारी कार्यालयाला पत्र देणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या स्कूलबस चालकांवर कारवाई सुरूच राहील.- विजय काठोडे, उपपादेशिक परिवहन अधीकारी अमरावती
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३८ स्कूलबस, व्हॅनवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 10:01 PM
आरटीओच्या नियमावलीचे सर्रास उल्लंघन होत असल्याने आरटीओने कारवार्इंचा बडगा उगारला असून, ११० वाहनांची तपासणी करून ३८ स्कूल बस व व्हॅनचालकांवर कारवाई केली. यातून ४३ हजार ७९० रुपये दंड वसुली करण्यात आली. ही मोहीम १५ दिवस राबविण्यात येणार आहे.
ठळक मुद्देचालकांचे धाबे दणाणले : १५ दिवस राबविणार मोहीम