शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

आदिवासींची ३८० राखीव पदे गायब ! पोलिस आयुक्तांलयातून २०९ पदांचा अनुशेष शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 13:26 IST

Amravati : मुख्यमंत्र्यांपुढे पदभरतीचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : राज्यात गृहविभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या पोलिस आयुक्तांलयामधून आदिवासींची तब्बल ३८० राखीव पदे गायब असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून पुढे आली आहे. महाराष्ट्रात मोठ्या शहरी समूहासाठी आयुक्तालय प्रणाली स्वीकारली आहे. राज्यात बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, मुंबई रेल्वे, पिंपरी-चिंचवड, मीरा-भाईंदर, वसई, विरार अशी एकूण १२ आयुक्तांलये आहेत.

पोलिस आयुक्तांलयात गट 'अ' ते 'ड'संवर्गात एकूण मंजूर पदे ४७ हजार ६६६ आहे. यापैकी अनुसूचित जमातीसाठी ३ हजार ३३१ पदे राखीव आहे. अनुसूचित जमातींची भरलेली पदे ३ हजार १२२ आहे. ३८० पदांचा पूर्वीचा अनुशेष शिल्लक आहे. जातवैधता प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांची संख्या २ हजार ७४२ आहे. ३८० जणांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या ३८० आहे.

मुख्यमंत्र्यांपुढे पदभरतीचे आव्हान राज्यातील पोलिस आयुक्तालयात बनावट जातप्रमाणपत्राच्या आधारे जातीची चोरी करणाऱ्यांनी आदिवासी समाजाची बळकावलेली राखीव पदे भरण्याचे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री योगेश कदम (गृह शहरे) व पंकज भोयर (गृह ग्रामीण) यांच्यापुढे यानिमित्ताने उभे ठाकले आहे.

"अधिसंख्य पदावर ३८० जणांना वर्ग केल्यानंतर ती पदे रिक्त दाखवायला पाहिजे होती. पण कोणतीच पदे रिक्त दाखविण्यात आलेली नाही. बेपत्ता झालेल्या पदांचा छडा लावून आदिवासी समाजाला न्याय द्यावा. अनुसूचित जमातींच्या उमेदवारांची विशेष पदभरती मोहीम राबविण्यात यावी." - अरविंद वळवी, राज्य संघटक, ट्रायबल फोरम

अनुसूचित जमाती पदभरती तपशीलसंवर्ग                 एकूण मंजूर पदे          राखीव पदे         भरलेली पदे            अधिसंख्य पदेगट-अ                        १२                            १                           १                               ०गट-ब                         १३४                          १०                         ५                               १गट क                       ४७१९६                    ३२९४                    ३११०                            ३७८गट-ड                         ३२४                        २६                           ६                              १                            ४७,६६६                ३,३३१                   ३,१२२                         ३८०

 

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाAmravatiअमरावती