अमरावती : अधिकार्यांची पदोन्नती व बदली प्रक्रीयेला सुरवात झाली आहे. शुक्रवारी राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी राज्यातील ३९४ सहाय्यक पोलीस निरीक्षकांची पोलीस निरीक्षकांना तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती दिली. यामध्ये अमरावती शहराला ८ व अमरावती ग्रामीणला ९ पोलीस निरीक्षक नव्याने मीळाले आहेत.पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी शुक्रवारी राज्यातील ३९४ सहाय्यक पोलीस निरीक्षकांची तात्पुरत्या स्वरुपात पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाल्याचे आदेश निर्गमीत केले. यामध्ये अमरावती शहर पोलीस आयुक्तलयात नव्याने ८ पोलीस निरीक्षक रुजु होणार आहेत. यात रमेश साहेबराव साठे, दिलीप फकीरा इंगळे, सतिश भानुदास चींचळकर, विकास गोविंद तीडके, दत्ता सावळाराम गावंडे, प्रदिप वसंत कसबे, किशोर नंदकुमार साळवी, दिलीप शंकरराव वडगावकर यांचा समावेश आहे.अमरावती ग्रामीणमध्ये ९ जणांना पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये गोरख वीश्वनाथ दिवे, सुनील दिवाणराव जाधव, रामचंद्र नारायण घाडगे, बळीराम रखमाजी गीते, शरद नाथा इंगळे, विलास मधुकर चौगुले, भगवान भिमराव कांबळे, पंकज उमाकांत पटवारी, चंद्रकात वीठ्ठल बनकर यांचा समावेश आहे.अमरावती ग्रामीण भागात कार्यरत असणार्या तीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदी अकोला व बृहमुंबई येथे पदोन्नतीवर पाठविण्यात आले आहेत. यामध्ये संजीव दगडु सोळंके, अर्जुन भगवान ठोसरे, सतिश राधेलाल उपाध्यय यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
३९४ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती
By admin | Published: May 30, 2014 11:20 PM