शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
2
परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
3
पुन्हा बॅगा तपासल्या! तिसऱ्यांदा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
4
‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार? 
5
'RBI ने व्याजदर कमी करावेत' गोयल यांच्या मागणीवर गव्हर्नर दास यांचं एका वाक्यात उत्तर
6
कर्नाटकात भाजप ‘ऑपरेशन लोटस’ चालवत आहे; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनंतर शिवकुमारांचा दावा
7
जरी मला मुख्यमंत्री केले तरी मी होणार नाही; 'महाराष्ट्राचा सीएम कोण'वर असे का बोलले नितीन गडकरी?
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'१५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार'; भाजपा महिला नेत्याचं वादग्रस्त विधान
9
Ranji Trophy : एका डावात दोघांची ट्रिपल सेंच्युरी; डाव घोषित केल्यामुळं हुकली वर्ल्ड रेकॉर्डची संधी
10
महाराष्ट्राच्या रणांगणात ४० लाख उत्तर भारतीय मतदार; मुंबईत २२ जागांवर निर्णायक मते
11
"मला हा सिनेमा पाहायचा नव्हता कारण.."; सविता मालपेकर यांचं '..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'बद्दल रोखठोक मत
12
‘बटेंगे तो कटेंगे’,‘एक हैं तो सेफ हैं’वर जरांगेंची टीका; म्हणाले, “मराठा हिंदूतील मोठा समाज”
13
"अदानींचं विमान वापरायचं, गौतमभाई म्हणत सोबत ढोकळा चटणी खायची आणि नंतर…’’, नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"नितीन गडकरी चांगले नेते, पण देवाभाऊ..."; सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांवर निशाणा
15
“लाखो रोजगार गुजरातला, राज्याचे किती कोटींचे प्रकल्पही गेले?”; राहुल गांधींनी आकडाच सांगितला
16
'PM मोदींनी कधीच संविधान वाचले नाही, त्यामुळे त्यांना ते कळणार नाही,' राहुल गांधींचे टीकास्त्र
17
शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचं आवाहन केलं; दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया 
18
Swiggy Share Price : सलग दुसऱ्या दिवशीच्या तेजीनंतर Swiggy चा शेअर आपटला, कंपनीला ३ ते ५ वर्षांत उत्तम वाढीची अपेक्षा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'लोकसभेला विशाल पाटील यांना मदत झाली, शिवसेनावाले क्षमा करा', भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली
20
"बटेंगे तो पॉकेट कटेंगे और भाजपावाले हटेंगे तो दाम घटेंगे", महागाईवरून काँग्रेसचा टोला

मृत गाईच्या पोटात ४० किलो प्लास्टिक

By admin | Published: June 22, 2017 12:12 AM

शवविच्छेदनानंतर गाईच्या पोटातून सुमारे ३५ ते ४० किलो प्लास्टिकचा गोळा निघाला.

शवविच्छेदन अहवाल: जनावरांना मोकाट सोडू नकालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शवविच्छेदनानंतर गाईच्या पोटातून सुमारे ३५ ते ४० किलो प्लास्टिकचा गोळा निघाला. बालाजी प्लॉट परिसरात ही गाय सोमवारी दुपारी मृतावस्थेत आढळून आली असून यापूर्वीही तीन ते चार गायी दगावल्याच्या तक्रारी महापालिका पशुवैद्यकीय विभागाला प्राप्त झाल्या होत्या. गाईच्या मृत्यूबाबत गंभीर दखल घेत गोवंश जनावरांना मोकाट सोडू नका, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाने पशू पालकांना केले आहे. बालाजी प्लॉट परिसरात मंगळवारी एक गाय मृतावस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच राजापेठचे पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांच्यासह महापालिकेतील पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलीस पंचनामानंतर गायीच्या मृतदेहाला कंम्पोस्ट डेपोत नेण्यात आले. तेथे पशुवैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे्र यांनी गाईचे शवविच्छेदन केले. त्यावेळी ही धक्कादायक बाब पुढे आली. गाईच्या पोटातून चक्क ३५ ते ४० किलोचा प्लास्टिकचा गोळा बाहेर निघाला. शहरात अनेक गोवंश जनावरे मोकाट फिरताना आढळून येतात. शहरवासी गार्इंना अन्नपदार्थ देताना ते अन्न प्लास्टिकवर टाकतात. ते पदार्थ खाताना गाय अन्न समजून प्लास्टिकच्या पिशव्या सुध्दा खातात. डॉक्टरांच्या मते, दैनंदिन आहारात गार्इंना ५ ते १० किलोचे अन्न लागते. अन्न खाऊन दिवसभर त्या रवंत करतात. अशावेळी दररोज थोडेफार प्लास्टिक गार्इंच्या खाण्यात आले, तर अन्नपदार्थ पचन झाल्यानंतर प्लास्टिक पोटातच साठून राहते. त्यामुळे पाच ते सहा महिन्यात गार्इंच्या पोटातील आतील भाग हा संपूर्ण प्लास्टिकने व्यापला जातो. प्रसंगी गाईची प्रकृती बिघडून तिचा मृत्यू होतो. त्यामुळे पशुपालकांनी गार्इंना मोकाट न सोडता त्यांच्या चाऱ्याची सोय करावी. आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका पशुवैद्यकीय विभागाने केले आहे.