संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात गत आठ महिन्यांत ४०६ सापळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी झाले. लॉकडाऊन काळात अनेक लाचखोरांना एसबीच्या अधिकाऱ्यांनी पकडले. या कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत सापळ्यांमध्ये सरासरी ५० टक्कयांनी कमी आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. अपसंपदेचे नऊ, तर अन्य भ्रष्टाचाराचे २० गुन्हे दाखल झाले असून, १ जानेवारी ते २ सप्टेंबरदरम्यान ४३५ गुन्हे एसीबीने दाखल केले आहेत.
लाचखोरीत पुणे परिक्षेत्र अव्वलस्थानी आहे. येथे १०० सापळ्यांमध्ये १४१ जण एसीबीच्या जाळ्यात अडकले असल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. आठ महिन्यांत सर्वात कमी १० सापळे हे मुंबई परिक्षेत्रात यशस्वी झाले. २०१९ मध्ये आठ महिन्यांत ८६६ सापळे यशस्वी झाले तर अपसंपदेचे २० व अन्य भ्रष्टाचाराचे पाच असे एकूण ८९१ गुन्हे नोंदविण्यात आले होते. गतवर्षीच्या तुलनेत लॉकडाऊन काळात अनेक शासकीय कार्यालये बंद होती. नागरिकांचाही फारसा कार्यालयात वावर नसल्याने पाच महिन्यांत गुन्ह्यांमध्ये घट झाल्याच्या आकडेवारीवरून दिसून येते. ४०६ ट्रॅपमध्ये एकूण ९८ लाख ८४ हजार २२० रुपयाची लाच रक्कम अधिकाºयांनी जप्त केली.विभागनिहाय सापळेपरिक्षेत्र गुन्हे आरोपीमुंबई १० १६ठाणे २८ ४३पुणे १०० १४१नाशिक ५९ ७४नागपूर ५७ ७४अमरावती ५३ ७०औरंगाबाद ५१ ७२नांदेड ४८ ६६एकूण ४०६ ५५५महसूल विभाग अव्वलगत आठ महिन्यांत ४०६ एसीबी ट्रॅप यशस्वी झाले. लाचखोरीत नेहमीप्रमाणे महसूल विभाग अव्वल स्थानी आहे. १०३ सापळ्यांत अधिकारी, कर्मचारी अडकले. दुसरा क्रमांक हा पोलीस प्रशासनाचा असून, ९६ सापळ्यांमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी अडकले. महावितरणचे २१, महानगररपालिका १६, नगरपरिषद १४, पंचायत समिती ३७, वनविभाग १८,आरोग्य विभाग १३, सहकार व पणन विभाग १२, शिक्षण विभाग १४, कृषी विभाग ११, तर अन्य अनेक विभागांचा सापळ्यांमध्ये समावेश आहे.