अमरावती : जलसंपदा विभागात अनेक महत्त्वाचे पदे रिक्त असून, मुख्य अभियंता जलसंपदा कार्यालय व मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) कार्यालयांतर्गत उपअभियंता संवर्गातील गट ‘अ’ व ‘ब’ संवर्गातील ४२ पदे रिक्त आहेत. या पदांचा अतिरिक्त प्रभार अनेकांकडे सोपविल्यामुळे इतर अधिकारी व तांत्रिकी कर्मचारी, अधिकाºयांच्या कामाचा ताण वाढला आहे.
काही आठवड्यांपूर्वीच जलसंपदा विभाग मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) संजय घाणेकर यांची महासंचालक महाराष्ट्र अभियांत्रिकी संघटना (मेरी) नाशिक येथे पदोन्नती मिळाल्याने त्यांचा प्रभार जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता रवींद्र लांडेकर यांच्याकडेच सद्यस्थिती सोपविण्यात आला आहे. रवींद्र लांडेकर यांच्या खांद्यावर आता दोन मुख्य अभियंत्याची धुरा आहे. अनुशेषांतर्गत व बिगर अनुशेषांतर्गत अनेक प्रकल्प पूर्ण करण्याचे आवाहन जलसंपदा विभागावर आहे. परंतु, रिक्त पदे व जे पदे कार्यरत आहेत, त्यांच्या बदल्या झाल्यात, अशा रिक्त पदांचा प्रभार सोपविण्यात आला आहे. परिणामी कामे प्रभावित झाली आहेत.
मुख्य अभियंता कार्यालय जलसंपदा विभाग अमरावती विभागात एकूण १०७ मंजूर पदे आहेत. त्यापैकी ८१ पदे भरली असून २६ पदे रिक्त आहेत. मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) जलसंपदा विभागात एकूण ७० पदे मंजूर असून, त्यापैकी ५४ पदे भरली गेली, तर १६ महत्त्वाची पदे रिक्त आहेत. म्हणजे दोन्ही मुख्य अभियंता कार्यालयांमध्ये एकूण १७७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १३५ पदे भरलेली आहेत. त्या कारणाने प्रकल्पांचा सिंचन अनुशेष कमी करण्यासाठी एकीकडे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र रिक्त पदांचा अनुशेष वाढतच चालला आहे. असा आहे रिक्त पदांचा तपशील मुख्य अभियंता १) प्रादेशिक कार्यालय-०२) उर्ध्व वर्धा सिंचन मंडळ अमरावती -६३) बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ- ३४) यवतमाळ पाटबंधारे प्रकल्प मंडळ -१०५) यवतमाळ सिंचन मंडळ यवतमाळ -७एकूण -२६
मुख्य अभियंता कार्यालय (विशेष प्रकल्प) १) प्रादेशिक कार्यालय -१२ अकोला सिंचन मंडळ -९३)अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळ ११४ वाशिम पाटबंधारे मंडळ- १४एकूण- १६
अकोला व पुसद कार्यकारी अभियंत्याचे पदे रिक्तमुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) जलसंपदा विभाग अमरावती अंतर्गत १२ कार्यकारी अभियंत्याचे पदे मंजूर आहेत. यापैकी १० कार्यकारी अभियंता कार्यरत असून, एक कार्यकारी अभियंत्याचे पदे विदर्भ सिंचन पाटबंधारे मंडळाकडे वर्ग करण्यात आले असून तर अकोला सिंचन मंडळातील कार्यकारी अभियंत्याचे पद रिक्त आहे. तेथे लवकरच नवीन कार्यकारी अभियंता रुजू व्हावे, यासाठी प्रक्रिया सुरूअसल्याची माहिती आहे. मुख्य अभियंता कार्यालयांतर्गत यवतमाळ जिल्हतील पुसद येथीलही एका कार्यकारी अभियंत्याचे पद रिक्त आहे.