आरटीओंचे दुर्लक्ष : विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ज्या स्कूल व्हॅनची फिटनेस तपासणी झाली आहे तसेच फिटनेस व्हॅलिड आहे; पण, दरवर्षी ३० जूनच्या आत स्कूल व्हॅनची फेरतपासणी करणे अनिवार्य आहे. मात्र फेरतपासणीविनाच ४२४ स्कूल व्हॅन रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याकडे आरटीओच्या मोटर वाहन निरीक्षकांचे दुर्लक्ष असून स्कूल व्हॅनची तपासणी केल्यास सत्य बाहेर येईल फेरतपासणी न करण्यात आल्यामुळे याच स्कूल व्हॅनमधून हजारो विद्यार्थ्यांना ने - आण केली जात असल्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. स्कूल व्हॅनचा परवाना घेतानाच त्याची फिटनेस तपासणी करावी लागते. तसे प्रमाणपत्र स्कूल व्हॅन चालकाकडे असणे गरजेचे आहे. पण या व्हॅनची शाळा सुुरू होण्यापूर्वी दरवर्षी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातून फेरतपासणी करणे अनिवार्य आहे. मात्र अद्यापही ४२४ लहान - मोठ्या स्कूल व्हॅनच्या चालकांनी फेरतपासणी केली नसल्याची माहिती आहे. जिल्ह्यात एकूण नोंदणीकृत ८२५ स्कूल व्हॅन आहेत. त्या विविध शाळांवर विद्यार्थ्यांना सेवा देतात. त्यापैकी ७ जुलैपर्यंत ४०१ स्कूल व्हॅनचीच फेरतपासणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे इतर वाहनांची फेरतपासणी केव्हा? हा प्रश्न पुढे येत आहे. विद्यार्थी शाळेत ने - आण करताना काही अनुचित घटना घडल्यास याला जबाबदार कोण, हा प्रश्न आहे. फेरतपासणी केलीच नसेल तर मोटार वाहन निरीक्षक अशा स्कूल व्हॅनच्या संचालकांविरूद्ध कारवार्इंचा बडगा केव्हा उगारणार आहे. स्कूल, व्हॅनमध्ये आग लागली तर त्या विझविण्यासाठी अग्निशमन सिलिंडर (फायर एक्टेंशन) आहे की नाही, विद्यार्थ्यांसाठी सिटींग व्यवस्था केलेली आहे की नाही? स्कूल वाहनांचा नियमाने स्पिड बांधला आहे. की नाही? स्कूल व्हॅनेच ब्रेक बरोबर आहे का? तसेच इतर अनेक बाबींची फेरतपासणीमध्ये तपासणी करण्यात येते. त्यामुळे फेरतपासणी न केलेल्या स्कूल व्हॅनच्या चालकांविरूद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. १९०० रूपयांपर्यंत दंडाची तरतूद ३० जूनपर्यंत ज्या स्कूल व्हॅनचालकांनी व्हॅनची फेरतपासणी केली नाही, त्यांची फेरतपासणी करण्यात येत असेल तर १३२० ते १९०० रूपये दंड संबंधितांवर ठोठावण्याची तरतूद असल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी "लोकमत"शी बोलताना सांगितले. संबंधितांनी स्कूल व्हॅनची फेरतपासणी करून घ्यावी यासंदर्भात यापूर्वीच चालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र मुदत संपूनही त्यांनी फेरतपसणी केलेली नाही. त्यामुळे संबंधित व्हॅनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.- विजय काठोडे, प्र.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
फेरतपासणीविनाच धावतात ४२४ स्कूल व्हॅन
By admin | Published: July 08, 2017 12:10 AM