६३ कोटी प्राप्त : १ लाख ६३ हजार १२५ शेतकऱ्यांना लाभ अमरावती : गतवर्षी नैसर्गिक आपत्तीत अवर्षण, गारपीट, अतिवृष्टी यामुळे १ लाख ६३ हजार १२५ शेतकरी बाधित झाले. यासाठी शासनाने ६३ कोटी ८५ लाख ४१ हजारांचा निधी जिल्हा प्रशासनाला दिला. यापैकी ४३ कोटी ३ लाख ६६ हजार ९८३ रुपयांचा निधी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला, तर २० कोटी ८१ लाख ७४ हजारांचा निधी शासनाला समर्पित केला आहे. आॅक्टोबर २०१३ मधील अतिवृष्टीसाठी ६ कोटी २६ लाख २१ हजारांचा निधि जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाला होता. या पैकी ६ कोटी २५ लाख ९८ हजार ५०२ रुपयांचा निधी ३७ हजार १२४ शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्यात आला आहे. खरीप २०१४ मधील हंगामात ८ कोटी ७५ लाखांचा निधी जिल्ह्यात उपलब्ध झाला होता. यापैकी ७ कोटी ३२ लाखांचा निधी २१ हजार ६१६ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. फेब्रुवारी-मार्च २०१५ मधील गारपीटसाठी १२ कोटी २४ लाख ८२ हजार २०० रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध केला होता. या पैकी ११ कोटी २६ लाख ६० हजार ३०५ रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्यात आला. २०१३ मधील अतिवृष्टीग्रस्तांसाठी १९ कोटी ३ लाख २२ लाख ९० हजार ९०४ रुपयांचा निधी ७,२५७ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला. जुलै २०१४ मधील अतिवृष्टीग्रस्तांसाठी १७ कोटी, ५२ लाख २१ हजारांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला होता. यापैकी १५ लाख २७ लाख ८५ हजारांचा निधी ८१ हजार १४० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे. या एकूण निधीपैकी २० कोटी ८१ लाख ७४ हजार १७ हजारांचा निधी शासनाला समर्पित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)२० कोटींचा निधी शासनाला समर्पितगतवर्षी जिल्ह्यात प्राप्त ६३ कोटी ८५ लाख ४१ हजार रुपयांच्या निधीपैकी ४३ कोटी ३ लाख ६६ हजार ९८३ कोटी रुपये १ लाख ६३ हजार १२५ शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्यात आले. उर्वरित २० कोटी ८१ लाख ७४ हजारांचा निधी शासनाला समर्पित करण्यात आलेला आहे. यामध्ये सर्वाधिक १५ कोटी ८० लाख २८ हजारांचा निधी २०१३ मध्ये अतिवृष्टीसाठी मिळालेल्या मदतीचा आहे. आॅक्टोबर २०१३ अतिवृष्टीचे २ कोटी २४ लाख ९९ हजार ९७७ रुपये व खरीप २०१४ मधील दुष्काळी स्थितीसाठी मिळालेला १ कोटी ७४ लाख ६७ हजार ८४१ रुपयांचा निधी शासनाला परत करण्यात आलेला आहे.
गतवर्षी आपत्तीसाठी शेतकऱ्यांना ४३ कोटींची मदत
By admin | Published: June 10, 2016 12:20 AM