लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठमार्फत सोमवारी घेण्यात आलेल्या ऑनलाईन पीएच.डी. एमपेट परीक्षेपासून पहिल्या दिवशी ४४८ विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागले. परीक्षा केंद्रावर वेळेत न पोहचल्याने विद्यार्थ्यांचे लॉगइन झाले नाही. त्यामुळे २१७७ पैकी १७२९ विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली.विद्यापीठ अंतर्गत अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात पीएच.डी. पदवी मिळविण्यासाठी एम.पेट परीक्षा ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी घेण्याचे नियोजन चालविले आहे. पीएच.डी. प्रवेश परीक्षेसाठी ४२४१ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यानुसार पहिल्या दिवशी २१७७ विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरविण्यात आले. मात्र, परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी न पोहचणाऱ्या ४४८ विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. मंगळवार, १ ऑक्टोबर रोजी पाचही जिल्ह्यातील केंद्रावर २०६४ विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरविण्यात आल्याची माहिती विद्यापीठाच्या पीएच.डी. सेल विभागाचे उपकुलसचिव सुजय बंड यांनी दिली. परीक्षा केंद्रावर वेळेवर न पोहचल्यास परीक्षेपासून वंचित राहावे लागेल, असे त्यांनी कळविले आहे.
पीएच.डी. एमपेट परीक्षेतून ४४८ विद्यार्थी वंचित ; अमरावती विद्यापीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 11:28 AM
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठमार्फत सोमवारी घेण्यात आलेल्या ऑनलाईन पीएच.डी. एमपेट परीक्षेपासून पहिल्या दिवशी ४४८ विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागले.
ठळक मुद्देलॉग इनचा फटका २१७७ पैकी १७२९ विद्यार्थी परीक्षेला हजर