शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

४५९ ठिकाणी अद्यापही नाहीत अंगणवाडी इमारत

By admin | Published: February 17, 2016 12:05 AM

प्राथमिक शिक्षणाचा पाया असलेल्या अंगणवाड्या जागेच्या प्रतीक्षेत आहेत. जागा नसल्याने जिल्ह्यातील ४५९ अंगणवाड्या पर्यायी जागेत सुरू आहेत.

जागेची वानवा : पर्यायी जागांवर होतात बालकांवर संस्कार जितेंद्र दखने अमरावतीप्राथमिक शिक्षणाचा पाया असलेल्या अंगणवाड्या जागेच्या प्रतीक्षेत आहेत. जागा नसल्याने जिल्ह्यातील ४५९ अंगणवाड्या पर्यायी जागेत सुरू आहेत. शासनाकडून मिळणारे भाडे तुटपुंजे असल्याने अंगणवाड्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. नवीन इमारतीसाठी जिल्हा नियोजननेही अंगणवाडी बांधकामांना कात्री लावल्याने बालकांवर अन्याय झाला. प्राथमिक पूर्व शिक्षणाचा पाया भक्कम करून मुलांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून गावोगावी महिला व बालकल्याण विभागांतर्गत अंगणवाडी भरविली जाते. या वर्गात १ ते पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या पोषणाची काळजी घेतली जाते. जिल्ह्यात २ हजार ४९९ अंगणवाड्या मंजूर असून लाखो बालके या अंगणवाडीत पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत अंगणवाड्याचे नियंत्रण ठेवले जाते. परंतु अलीकडच्या कालावधीत अंगणवाड्यांची दैना झाली आहे. मदतनीस पर्यवेक्षिकांना वेळेवर मानधन दिले जात नाही. याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. तथापी शासनाने दुर्लक्ष केल्याने अडचणीत वाढत आहेत. जिल्ह्यात आजही ४५९ अंगणवाड्या नाहीत. या गावातील तसेच सार्वजनिक ठिकाणी भरत आहेत. जिल्हा परिषद इमारती बांधून देण्यास तयार आहे. पण जागा खरेदीची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे इमारतीसाठी निधी असूनही जागेअभावी अंगणवाड्यांवर संक्रांत आली. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीने एकीकडे जागा उपलब्ध नसताना इमारत बांधकामाच्या जिल्हा नियोजनाच्या निधीला कात्री लावण्यात आली आहे. सरकारच्या उदासीन धोरणाचा फटका चिमुरड्यांना बसत आहे.अशी लावली कात्रीजिल्हा परिषदेला जिल्हा नियोजनकडून २०१४-१५ मध्ये ७ कोटी १४ लाख निधी उपलब्ध झाला. त्यात ११९ नवीन इमारती बांधण्यात आल्या. सन २०१५-१६ साठी ७ कोटींचा निधी मिळाला. या निधीतून ११६ अंगणवाड्या बांधण्यात आल्यात. पण सन २०१६-१७ वर्षासाठी ५ कोटींची मागणी करून अवघी ३ कोटींची तरतूद करून मागील वर्षीच्या तुलनेत दुपटीने कपात केली आहे. तुटपुंज्या भाड्याची तरतूदभाडोत्री खोली घेऊन अंगणवाडी चालविण्यासाठी शासनाकडून ग्रामीण भागात दरमहा २०० तर शहरी भागात साडेसातशे रुपये दिले जातात. परंतु या रकमेत खोली भाडेतत्त्वावर मिळणे अडचणीचे होत आहे. ही रक्कम वाढविण्याचीही मागणी होत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या जागेत सोयीसुविधाही अपुऱ्या आहेत.जिल्ह्यात अंगणवाडी बांधकामासाठी उपलब्ध होणाऱ्या निधीतून आम्ही अंगणवाडी बांधतो. परंतु जागा उपलब्ध होत नसल्याने पर्यायी जागेत अंगणवाचे मुले बसविले जातात.भाडेचे जागेवर, ग्रामपंचायत शाळेच्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल तेथे अंगणवातील मुले बसविले जात आहेत.- कैलास घोडके, डेप्युटी सीईओ, मबाक