अमरावती : नागपुरीगेट ठाणे हद्दीत शहर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून ३६ लाख ६१ हजारांचा अवैध गांजा, तर १० लाखांचा कार व ट्रक असा एकूण ४६ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही आतापर्यंतची शहरातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. ही कारवाई बुधवारी सकाळी इकबाल कॉलनीत करण्यात आली.
ट्रक क्रमांक ३१ सीआर ४४९४ व कार एमएच ३० एफ १९६८ यात आरोपीने साठविलेला गांजा (अंमली पदार्थ) विक्रीसाठी नेणार असल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी धाड टाकून ३६ लाख ६१ हजार रुपये किमतीचा ३६६ किलो १०० ग्रॅम गांजा व १० लाखांची दोन चारचाकी वाहने असा ४६ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. हा गांजा कुणाचा? कुठून आला व कुठे जात होता तसेच आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलाश पुंडकर, पीएसआय नरेंद्रकुमार मुंढे, एएसआय संजय वानखडे, पोलीस हवालदार राजुआप्पा बाहेनकर, फिरोज खान, अजय मिश्रा, जावेद अहमेद, सतीश देशमुख, निलेश पाटी, सुधीर गुडधे, दिनेश नांदे, एजाज शहा निवृत्ती काकड, उमेश कापडे, प्रशांत नेवारे आदींनी केली.