सद्यस्थितीत म्युकर मायकोसिसचे रुग्ण कमी आढळून येत असले तरी निदान झालेल्यांपैकी दोनच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. या आजारात उपचार महागडे असून शरीराची क्षमता बघूनच ही औषधी देण्याचा विचार डॉक्टरांना करावा लागत असल्याने म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा रिकव्हरी रेट फारच कमी असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
बॉक्स
एका रुग्णाचा एक डोळा निकामी
जिल्हा सामान्य रुग्णालयात अमरावती स्थित नेहरू नगरातील एका ६० वर्षीय रुग्ण ११ जून रोजी दाखल झाला. त्याचेवर उपचार सुरू असतानाच त्याचा उजवा डोळा खराब असल्याचे निदान झाले. त्यामुळे त्याला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात ११ जूनलाच रेफर करण्यात आले.
-
एकाचा वरचा जबडाच काढला
नांदगाव पेठ येथील ३३ वर्षीय म्युकरमायकोसिसच्या रुग्णाला दात दुखीचा त्रास असह्य झाले होते. उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हते. त्यामुळे डॉक्टरांनी वरील १६ दातांचा अख्खा संचच काढून टाकल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
-
दोन महिन्यात चौघांचा मृत्यू
जिल्हा सामान्य रुग्णालयातील वार्ड १०, १४ व १६ मध्ये म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यांना वेळोवेळी डॉक्टर व्हिजीट देत असून, त्यांची नियमित ऑक्सिजन लेव्हल तपासण्यात आहे. मात्र, उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने मे महिन्यात दोघांचा व जून महिन्यात दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये सुधाकर श्रीराम पेहनकर (४९, नांदगाव पेठ), रामदास गोंडाजी मांजरे (७०, गौरखेडा), शशिकांत श्यामराव महाकाळ (४५, वडाळी) यांचा समावेश आहे.
-
एका रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल जेमतेम
परतवाडा येथील ४५ वर्षीय रुग्ण पोस्ट कोविडनंतर म्यकरमायकोसिसचे निदान झाल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर झाले. त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने त्यांना कृत्रिम ऑक्सिजन लावले खरे, मात्र त्यांची लेव्हल जेमतेम राहिल्याने वार्ड १४ मधून वार्ड १० मध्ये रेफर केले असून आता त्यांची ऑक्सिजन लेव्हल जेमतेम असल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली.
-
ही आहेत लक्षणे
डोळ्याच्या पापणीला सूज येऊन जड वाटणे, दात, दाढ दुखणे, डोकेदुखी, बधिरपणा, विसर पडणे ही म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे आहेत. पोस्ट कोविड झालेल्या रुग्णांना यापैकी कुठलीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे तपासणी करण्याचे आवाहन डॉक्टर नम्रता सोनोने यांनी केले.
ही घ्या काळजी
पोस्ट कोविड झाल्यानंतर घेतलेल्या उपचारांनी कोविडमधून तर रुग्णाची सुटका होते. मात्र, काही औषधांचा डोस अधिक प्रमाणात झाल्यास शरीरात बधिरता, विसर पडणे, डोळ्यांची पापणी भारी वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा. हा आजार संसर्गातून होत नसलाही त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असेही डॉक्टर म्हणाले.