धोक्याची घंटा : ६.०६ टीएमसी, २९ टक्के जलसाठालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे व जमिनीतील पाण्याची पातळीदेखील झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यातील ४६ लघुप्रकल्पाची स्थिती गंभीर आहे. या प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत ६.०६ दलघमी म्हणजेच २९.२३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असणाऱ्या शहानूर प्रकल्पात ४६.०४ टीएमसी साठ्याच्या तुलनेत सध्या २३.२० टीएमसी साठा आहे. ही ५०३९ टक्केवारी आहे. पूर्णा मध्यम प्रकल्पात संकलित ३५.३८ टीएमसी साठ्याच्या तुलनेत ८.३८ टीएमसी साठा आहे. ही २३.६९ टक्केवारी आहे. तसेच चंद्रभागा प्रकल्पात संकलीत ४१.२५ दलघमी साठ्याच्या तुलनेत २१.६१ दलघमी साठा शिल्लक आहे. ही ५२.३९ टक्केवारी आहे. लघुप्रकल्पामध्ये साखळी प्रकल्पात १६.०३२ टक्के, पिंपळगाव प्रकल्पात ८.३३ टक्के, माळेगाव प्रकल्पात २८.७५ टक्के, दस्तापूर ३०.२४, केकतपूर ३४.७६, दहीगाव धानोरा १८.७८, खनिजापूर १०५९, मालखेड १५.०७, सरस्वती २६.२२, भिवापूर १४.९०, वाई १८.९२, नागठाना १३.४५, साद्राबाडी ११.३६, पुसली २१.६२, नांदुरी १९.८१ व चारघड प्रकल्पात २६.२४ टक्के साठा शिल्लक आहे. एकूण तीन मध्यम प्रकल्पांत संकलित १२२.६७ दलघमी पाणी साठ्याच्या तुलनेत ५३.१९ दलघमी म्हणजेच ४३.३६ टक्के साठा शिल्लक आहे. यापूर्वी सन २०१२ मध्ये ५३.९० दलघमी, २०१३ मध्ये ६०.८४ दलघमी, २०१४ मध्ये ६९.३० दलघमी व २०१५ मध्ये ७३.१३ दलघमी साठा शिल्लक होता. अशीच स्थिती राहिल्यास महिन्या अखेरीस अनेक प्रकल्प कोरडे पडण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात एकमेव मुख्य प्रकल्प असणाऱ्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात सध्यास दिलासाजनक साठा आहे. मात्र, मध्यम व लघु प्रकल्पांनी चिंता वाढविली आहे. सध्या मध्यम प्रकल्पातून पाण्याच्या योजना व शेतीसाठी वापर होत आहे. गेल्या महिन्यापासून दिवसाच्या प्रचंड उष्णतामानामुळे या प्रकल्पातील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे असल्याने चिंता वाढली आहे. या लघुप्रकल्पांची स्थिती गंभीरसद्यस्थितीत गोंडवाघोली, गोंडविहीर, दाभेरी, शेतकरी, पंढरी, बेलसावंगी, जमालपूर, सावलीखेडा, लवादा, गमेनरी, ज्यूटपाणी, हे प्रकल्प कोरडे पडले आहेत. पिंपळगाव प्रकल्पात ८.३३ टक्के, सूर्यगंगा ५.९७, सावरपाणी ३.२८, बासलापूर ७.७५, टाकळी ४.१३, अमदोरी २.३७, त्रिवेणी ६.३१, जामगाव ६.२५, खारी ६.२२, गावलानडोह १.९४, मांडवा ३.९६, बोबदो २.९२, रभांग ३.६०, सालई ०.७१, मोगर्दा प्रकल्पात केवळ ४.३५ टक्केच जलसाठा आहे. हे प्रकल्प मे अखेरीस कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे.
४६ लघुप्रकल्प कोरडे
By admin | Published: May 07, 2017 12:12 AM