अमरावती : जिल्ह्यातील धारणी तालुक्यात शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास जोदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने ४७९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले व या आपत्तीमध्ये ८३० घरांची पडझड झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आहे.
येथील सर्व सेवा सुरळीत करून नुकसानीबाबत पंचनामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार महसूल व कृषी विभागाच्या क्षेत्रिय यंत्रणेद्वारा पंचनामे करण्यात आले. या आपत्तीमुळे बाधित नागरिकांना व शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या नव्या निकषाने मदत मिळणार आहे व तसा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.