शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

४९ कोटींची पाणीपुरवठा योजना लोकवर्गणीत अडकली

By admin | Published: June 16, 2015 12:28 AM

शहरातील साडेआठ लाख लोकसंख्येला शुद्ध पाणी मिळावे, यासाठी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने

३० टक्के वाटा कोण भरणार ? : महापालिकेने जबाबदारी झटकलींअमरावती : शहरातील साडेआठ लाख लोकसंख्येला शुद्ध पाणी मिळावे, यासाठी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नगरोत्थानअंतर्गत ४९ कोटींच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळविली आहे. मात्र, ३० टक्के लोकवर्गणीच्या वाट्यामुळे तूर्तास ती अडकली आहे. तिजोरीत ठणठणाट असल्याने महापालिकेने नकार दिला तर जीवन प्राधिकरण बोर्डाने अद्यापही मंजुरी प्रदान केली नसल्याने ही योजना अडकली असल्याचे वास्तव पुढे आले आहे.शहराचा वाढता विस्तार बघता ही योजना शहरवासींयासाठी अतिशय फलश्रूती ठरणारी आहे. ४४ कोटींची योजना वेळेत सुरु झाली नसल्याने ती आता ४९ कोटींवर पोहचली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे दौऱ्यावर असताना वाढीव पाणीपुरवठा योजेनेसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली होती. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी लागणाऱ्या निधीला मंजुरी प्रदान केली आहे. या योजनेसाठी लोकवर्गणीची ३० टक्के रक्कम ही महापालिका प्रशासनाने अदा करावी, असे पत्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंत्यांनी आयुक्तांच्या नावे पाठविले. परंतु महापालिका तिजोरीत ठणठणाट असल्याचे कारण पुढे करुन प्रशासनाने लोकवर्गणीची ३० टक्के रक्कम मजीप्राने भरावी, असे कळविले आहे. त्यामुळे लोकवर्गणीचे १५ कोटी रुपये मजीप्राने भरण्याची हमी देखील घेतली आहे. जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची त्याकरिता मंजुरी आवश्यक असल्याने ती अद्यापही मिळाली नाही. (प्रतिनिधी)नवीन योजनेत या कामांचा आहे समावेशबडनेरा, भीमटेकडी, नागपुरी गेट व कॅम्प येथे नवीन जलकुंभाची निर्मितीमोर्शीच्या सिंभोरा येथील सहा पंप बदलविणे१९२ कि.मी. ची जुनी जलवाहिनी बदलविणेनवीन नागरी वस्त्यांमध्ये १०० कि.मी.च्या जलवाहिन्या टाकणेतपोवन येथे ३२ दशलक्ष लिटरचे नवे शुद्धिकरण केंद्र साकारणे