वीरेंद्रकुमार जोगीअमरावती, दि. 23 - जिल्ह्याच्या अचलपूर उपविभागातील पाच तालुक्यांपैकी तीन तालुक्यात पेरलेल्या बियाण्यांची उगवण न झाल्याच्या ६४ तक्रारी प्राप्त झाल्या असून ४९ तक्रारींमध्ये न उगवलेले बियाणे महाबीजचेच आहे, हे विशेष.यातील सर्व बियाण्यांचा तपासणी अहवाल शेतकºयांना देण्यात आला आहे. कंपनी बियाणे सदोष असल्याचे मान्य करीत नसून हवामान व शेतकºयांचीच चूक दाखवून मोकळी होत आहे. अचलपूर उपविभागात अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चिखलदरा व धारणी तालुक्याचा समावेश होतो. यापैकी तीन तालुक्यांतून सर्वाधिक तक्रारी आहेत. दर्यापूर तालुक्यातून बियाण्यांच्या ३१ तक्रारी आहेत. त्यापैकी २९ तक्रारी महाबीजच्या आहेत. तर अंजनगाव तालुक्यातील १२ पैकी ११ तक्रारी व अचलपूर तालुक्यातील २१ पैकी ९ तक्रारींमध्ये महाबीजच्या बियाण्यांचा समावेश आहे.यासर्व तक्रारींवर कारवाई करण्यात आली असून बहुतांश तक्रारींचा अहवाल शेतकºयांना देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, यापेक्षा अधिक तक्रारींची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाबीजचे अधिकारी परस्पर शेतक-यांना भेटून त्यांनी शासकीय यंत्रणेकडे तक्रारी करून नये, यासाठी प्रलोभने देत आहेत. शेतकºयांनी तक्रार केल्यावर संबंधित शेतांची पाहणी करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, कृषीशास्त्रज्ञ (विद्यापीठाचा प्रतिनिधी) व कंपनीचा प्रतिनिधी यांची चमू तयार करण्यात येते. त्यांचा घटनास्थळावरील अहवालही महत्त्वाचा ठरतो, हे येथे विशेष.पावसाचे प्रमाण कमी-यंदा अमरावती जिल्ह्यातील अचलपूर उपविभागात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. अनेक शेतकºयांनी महाबीजचे सोयाबीन पेरले. मात्र, उगवण झाली नाही. सोयाबीनला आवश्यक असणारा पाऊस न झाल्यामुळे बियाणे उगवले नाही. आमच्यापर्यंत जेवढ्या तक्रारी आल्या त्यासर्व ठिकाणी भेटी दिल्याचे महाबीजच्या प्रतिनिधींनी सांगितले.आतापर्यंत प्राप्त सर्व तक्रारींवर कारवाई करीत नमुने घेण्यात आले आहेत. बहुतेक सर्व तक्र ारींचा अहवाल आला असून तो शेतकºयांना देण्यात आला आहे. यात तज्ज्ञांच्या मतांचा समावेश असतो. शास्त्रज्ञांचे मतही महत्त्वाचे ठरते.- प्रफुल्ल सातव,प्रभारी, उपविभागीय कृषी अधिकारी, अचलपूर
६४ पैकी ४९ तक्रारी महाबीज बियाण्यांच्या, अचलपूर उपविभागातील वास्तव : पेरले पण उगवलेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:05 PM