अमरावती : पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी ४९.६७ टक्के मतदान झाले. यापूर्वी २०१७ मध्ये ६३.५२ टक्के मतदान झाले होते. यावेळी निवडणुकीसाठी एकूण २,०६,१७२ मतदारसंख्या होती. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. १० वाजेपर्यंत ११,३२५ मतदान झाले. ही ५.४९ टक्केवारी होती.
दुपारी १२ पर्यंत ३२,८७२ मतदारांनी हक्क बजावला. ही १५.९४ टक्केवारी होती. दुपारी २ पर्यंत ६२,६६९ मतदान झाले. ही ३०.४० टक्केवारी होती. शेवटच्या टप्प्यात ४ वाजेपर्यंत ७२,९४३ पुरुष व २९,४५९ स्त्री असे एकूण १,०२,४०३ मतदान झाले. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ४३.३७ टक्के, अकोला ४६.९१, बुलडाणा ५३.०४, वाशिन ५४.८० तर यवतमाळ जिल्ह्यात ५८.८७ टक्के मतदान झाले आहे. येथील नेमाणी गोडावूनमध्ये २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.